ठाणेः राज्यात मागील महिन्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला उलथवून देत आता एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला ठाण्यातूनच पहिला झटका बसला. त्यानंतर मुंबईतील आमदार (Mumbai MLA) आणि नगरसेवकही शिंदेंच्या गळाला लागले. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ठाणे महापालिकेचाही क्रमांक आहे. येत्या तीन महिन्यात येथील निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे महानगरपालिकेच प्रभाग निहाय यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांनीही चांगलीच फिल्डिंग लावली आहे. विविध पक्षांचे नेतेही सक्रिय झालेत. शिवसेना आणि शिंदे सेना यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीचीही जोरदार तयारी सुरु आहे. वॉर्ड क्रमांक 37 मध्येही यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. यावेळी वॉर्डावर कुणाची सत्ता येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर अनेकांनी तिकिट मिळवण्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
ठाणे महापालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेची लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 एवढी आहे. .त्यातील अनुसूचित जातींची 1 लाख 26 हजार 003 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 698 एवढी आहे. ठाण्यातील मनपात142 जागांवर निवडणूक पार पडेल. यात अनुसूचित जातींच्या एकूण 10 आणि त्यापैकी 5 जागांवर महिला उमेदवार असतील. अनुसूचित जमातीतील 3 पैकी 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 15 जागा राखीव असून त्यातील 8 जागांवर महिला उमेदवार नशीब आजमावून पाहतील. सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकूण 114 जागा असून त्यातील 56 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीत सर्व मिळून एकूण 71 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
ठाणे महापालिकेतील प्रभाग 37 मधील अ मध्ये सर्वसाधारण महिला तर ब वॉर्डात सर्वसाधारण प्रवर्ग आणि क वॉर्डात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेतील प्रभाग 37 मध्ये एकूण लोकसंख्या 36 हजार 663 एवढी आहे. येथील अनुसूचित जातींतील मतदार 2277 तर अनुसूचित जमातींचे मतदार 1478 एवढे आगेत.
प्रभाग 37 मध्ये प्रामुख्याने पारसिक रेतीबंदर राणानगर, दत्तवाडी, शैलेश नगरचा काही भाग येतो. खारेगावच्या हद्दीतील सांगवी व्हॅली कंपाउंड भिंतीपासून उल्हास नदीपर्यंतचा परिसर, दक्षिणकेड मुंब्रा गावाच्या हद्दीपर्यंत आणि त्यानंतर पश्चिमेकडे बॉम्बे-पुणे रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर पुणे रस्त्याने दक्षिणेकडे सहयोग शॉपिंग सेंटरपर्यंतचा भाग यात येतो.
ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 37 अ
पक्ष | उमेदवार | विजयी-आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
मनसे | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 37 ब
पक्ष | उमेदवार | विजयी-आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
मनसे | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 37 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |