ठाणे : यंदाच्या (Thane Corporation) ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये 47 प्रभाग आहेत. गतवेळी 33 वार्डाचा समावेश होता. मात्र, यंदा निवडणुकीचे स्वरुप बदलले असून वाढत्या लोकसंख्यानुसार 14 प्रभागाची संख्या वाढललेली आहे. त्यामुळे यंदाच्या (Election) निवडणुकीमध्ये या वाढत्या प्रभागाचा महत्वाचा रोल राहणार आहे. एकीकडे राज्यातील राजकीय समिकरणे ही बदलेली आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेवर प्रमुख पक्षांची नजर राहणार आहे. अद्यापपर्यंत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला नसला उमेदवारांची चाचपणी आणि अंतर्गत प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ठाणे हा (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ आहे. त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करीत स्वतंत्र गट निर्माण केला आहे, त्यामुळे याचा थेट परिणाम हा महापालिका निवडणुकांवर होणार असून दोन्ही पक्षातीली गॅप भरुन काढण्याचा प्रयत्न हा इतर पक्षही करणार आहेत. त्यामुळे राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही पाहवयास मिळणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 39 ची भूमिका काय राहणार हे पहावे लागणार आहे.
यंदा नव्यानेच या प्रभागाची उभारणी झालेली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेपासून येथील उमेदवार आणि राजकीय समिकरणे ही नवखी असणार आहेत. त्यामुळे या प्रभागात कोणता पक्ष बाजी मारणार पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या निवडणुकीच्या अनुशंगाने प्रशासकीय कामकाज हे अंतिम टप्प्यात आहे. तर या प्रभागाची रचनाही नव्याने झाली असून या प्रभागात 38 हजार 40 लोकसंख्या आहे. यापैकी अनुसूचित जातीचे 1 हजार 627 तर अनुसूचित जमातीचे 1 हजार 569 मतदार आहेत. त्यामुळे येथील उमेदवाराचे भवितव्य हे सर्वसाधरण गटाच्या हातीच असणार आहे.
प्रभाग क्रमांक 39 हा यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरणार आहे. नव्या प्रभाग रचनेबरोबरच येथील राजकीय समिकरणेही नवीच राहणार आहेत.
शहातील महत्वाचा असलेला शैलेश नगर, बॉम्बे कॉलनी, आनंद नगर, आनंद कोळीवाडा मुंब्रा याभागाचा समावेश राहणार आहे. उत्तरेकडे शैलेश नगर इमारत क्रमांक 27 पर्यंत समावेश असणार आहे. तर पूर्वेकडे मुंबई-पुणे मार्गाने शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हद्द राहणार आहे. तर दक्षणिकडे मुंब्रा बायपासपर्यंतच्या मतदारांचा समावेश असणार आहे.
ठाणे महापालिका प्रभाग 39 ‘अ’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
ठाणे महापालिका प्रभाग 39 ‘ब’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
ठाणे महापालिका प्रभाग 39 ‘क’
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
वार्ड क्रमांक 39 (अ) सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 39 (ब) सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 39 (क) सर्वसाधारण
ठाणे महापालिकेची लोकसंख्या ही 18 लाख 41 हजार 488 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 26 हजार 003 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 698 एवढी आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 142 आहे. ठाणे महापालिकेत एकूण 47 प्रभाग आहेत. त्यात तीन सदस्यीय प्रभाग 46 असून चार सदस्यी प्रभाग एक आहे. प्रभागांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 10 तर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा राखीव आहेत. तसेच महिलांसाठी 71 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.