रत्नागिरी : जिल्ह्यातील मुरुड येथील (Sai Resort) साई रिसॉर्ट हे अनाधिकृत असून ते माजी मंत्री (Anil Parab) अनिल परबांचे असल्याचा आरोप भाजप नेते (Kirit Somaiya) किरीट सोमय्या यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून हे रिसॉर्ट पाडावे आणि संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. अखेर यावर प्रशासनाने देखील निर्णय घेतला आहे. लवकरच हे साई रिसॉर्ट आता जमिनदोस्त होणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल असे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांनी सांगितले आहे.मात्र, हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे असा उल्लेख कुठे केला गेला नाही. त्यामुळे मुरुड येथील हे रिसॉर्ट आता अल्पावधीतच जमिनदोस्त होणार आहे.
मुरुड येथील वादग्रस्त असलेल्या साई रिसॉर्टबद्दल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली आहे. बैठकीला जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने हे रिसॉर्ट पाडले जाणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.साई रिसॉर्ट बरोबरच येथील सी कॉन रिसॉर्टही जमिनदोस्त होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.
हे दोन्ही रिसोर्ट केंद्र शासनाच्या आदेशावरुन पाडले जाणार आहेत. त्या यासंबंधी कसे नियोजन असावे अशा सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रिसॉर्ट तर पाडले जाणार हे निश्चित आहे. शिवाय केंद्रसरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करुन पुढील कारवाई ही केली जाणार आहे. केंद्राच्या सूचनानंतक पाडण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात आला आहे.
मुरुड येथील साई रिसॉर्ट हे माजी मंत्री अनिल परब यांचे असल्याचा दावा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केला होता. शिवाय दोन दिवसांपूर्वीच ते येथे हातोडा घेऊन दाखल झाले होते. त्यानंतर आज प्रशासनाची बैठक पार पडली असून हे अनाधिकृत रिसॉर्ट जमिनदोस्त होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पण हे रिसॉर्ट कुणाचे याबाबत प्रशासनाने काही सांगितले नाही. शिवाय त्यांनी अनिल परब यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे रिसॉर्ट नेमके कुणाचे हा प्रश्न कायम आहे. मात्र, गेल्या अनेक दिवासांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेले साई रिसॉर्ट हे जमिनदोस्त होणार हे निश्चित.