विवेक गावंडे
नागपूर : आज वर्ध्यात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार (OBC Melawa Wardha) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात छगण भुजबळ, गोपिचंद पडळकर आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहाणार आहे. वर्धेच्या लोकमहाविद्यालय मैदानावर हा मेळावा घेण्यात येत आहे. आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही भावना निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र भर ओबीसी एल्गार मेळावे घेत अहो त्यात विदर्भातील पाहिलं मेळावा आज वर्धेला होत असल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली. आजचा मेळावा ऐतिहासिक होणार आहे ओबीसी समाजाचे आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी हा एल्गार असल्याचे शेंडगे म्हणाले.
मागासवर्गीय आयोग हा मागास न राहता मराठा आयोग झालं आहे असा घणाघात प्रकाश शेंडगे यांनी केला. मराठा समाजाला इडब्लूएसमधे 10 टक्के आरक्षण आहे . ते वाढवून घेण्यासाठी वेगळा प्रयोग करायचा असेल, टक्केवारी वाढवून घ्यायची असेल तर तुमच्या सोबत कुठेही यायला तयार आहोत अगदी दिल्लीतही यायला तयार आहोत असं शेंडगे म्हणाले. आयोगाच्या सदस्य यांना अक्षरशः हाकलून दिले आहे राजीनामे घेतले गेले आहे
आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे तर जरांगे यांच्या पाया जवळ बसले होते त्यांना सर सर म्हणत होते, मागासवर्गीय आयोग हा मागास न राहता मराठा आयोग झाला आहे अशी तिखट प्रतिक्रीया दिली आहे.
मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यावर बोलताना शेंडगे म्हणाले की, या आयोगाकडून आम्हला न्यायची अपेक्षा नाही आयोगाची मुदत मार्चमध्ये संपते त्या आधी आयोगात असे राजीनामे होऊन सदस्य नेमता येत नाही. आयोगाच्या नवनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान देणार त्यांच्या नियुक्ती ऐन वेळेवर करता येत नाही त्यांच्या अहवाला न्यायालयात आव्हान दिले तर ते टिकणार नाही असे मत प्रकाश शेंडगे यांनी दिले आहे.