नव्याने निवडून आलेल्या खासदाराला दिल्लीत जाताच ‘ही’ विशेष सुविधा मिळणार!

| Updated on: May 22, 2019 | 9:05 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल लागण्यासाठी आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. उद्या म्हणजेच 23 मे रोजी देशाच्या 17 व्या लोकसभेचे निकाल जाहीर होतील. निकाल जाहीर होताच कुठल्या मतदारसंघातून कोणता उमेदवार जिंकून आला आहे, हे देखील स्पष्ट होईल. नव निर्वाचित खासदारांना संसदेकडून शुभेच्छा दिल्या जातील. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह […]

नव्याने निवडून आलेल्या खासदाराला दिल्लीत जाताच ही विशेष सुविधा मिळणार!
मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला भाजप-शिवसेनेच्या युतीने धोबीपछाड दिली आहे. या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची यादी...
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल लागण्यासाठी आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. उद्या म्हणजेच 23 मे रोजी देशाच्या 17 व्या लोकसभेचे निकाल जाहीर होतील. निकाल जाहीर होताच कुठल्या मतदारसंघातून कोणता उमेदवार जिंकून आला आहे, हे देखील स्पष्ट होईल. नव निर्वाचित खासदारांना संसदेकडून शुभेच्छा दिल्या जातील. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर चार प्रमुख रेल्वे स्थानकांवर निवडणूक जिंकणाऱ्या सर्व सदस्यांच्या स्वागताची व्यवस्था केली जाईल. त्यासोबतच खासदारांसाठी संसद भवनपर्यंत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही केली जाईल.

नव निर्वाचित खासदारांसाठी राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच खासदारांना स्थायी ओळखपत्र, रेल्वे पास आणि सदस्य ओळखपत्रह दिलं जाईल.

लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या खासदारांना यावेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवण्यात येणार नाही. यावेळी त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. खासदारांसाठी सरकारी अस्थायी आवास, वेस्टर्न कोर्ट (संसदेचं हॉस्टेल) आणि नवी दिल्लीमधील राज्यांचे अतिथीगृह या ठिकाणांवर थांबण्याची व्यवस्था केली जात आहे. यामुळे हॉटेलवर होणारा मोठा खर्च वाचेल, त्यासोबतच खासदारांना असुविधाही होणार नाही.

नवीन खासदारांच्या राहण्याची आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच लोकसभा सचिवालयाला दिले होते. सचिवालयाच्या आदेशांवर वेस्टर्न कोर्टमध्ये 100 खोल्या तयार केल्या जात आहेत. वेस्टर्न कोर्ट हे खासदारांचं वस्तीगृह आहे, ज्यामध्ये एक शयनकक्षही आहे.

यासोबतच वेगवेगळ्या राज्यांच्या अतिथीगृहांमध्ये 280 खोल्या आरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथे 200 खासदारांच्या थांबण्याची व्यवस्था असेल. ज्या राज्यातून जास्त खासदार निवडून येतील त्यांना दुसऱ्य़ा राज्यांच्या अतिथीगृहांमध्ये थांबवण्यात येईल.

VIDEO :