मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, गोपीचंद पडळकरांची टीका

| Updated on: Jul 21, 2021 | 1:08 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. आता गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला.

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, गोपीचंद पडळकरांची टीका
गोपीचंद पडळकर आणि उद्धव ठाकरे
Follow us on

सांगली : “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. आता गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय”,

केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारनं याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

पाच वेळा मा. उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकरांनी केली.

मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपुरात 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2021) विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी 19 तारखेला दुपारी पंढरपूरला (Pandharpur) रवाना झाले.  रात्री 9 च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते.

शासकीय महापूजा 

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.

संबंधित बातम्या 

“बा विठ्ठला, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत”

मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

‘विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही’, निलेश राणेंचा हल्लाबोल

The Chief Minister is the guardian of the people, not the driver of the car, BJP MLC  Gopichand Padalkar criticizes Maharashtra CM Uddhav Thackeray Pandharpur visit