नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष चांगलाच पेटला आहे. मंगळवारी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा ? पुढची लढाई कोण जिंकणार? या सगळ्याचा फैसला आता निवडणुक आयोगच करणार आहे. मात्र, 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवरील सुनावणी आता दिवाळी नंतरच होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राज्यातील या सत्तासंघर्षाची सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
आमदार अपात्रतेसह इतर मुद्यांवर सुप्रीम कोर्टात 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत युक्तीवाद होणार आहे. याचा फैसला दिवाळीनंतर म्हणजेच जवळपास एक महिना लांबणीवर गेला आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तर, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा निर्णय कोर्टाने निवडणुक आयोगावर सोपवला आहे.
1 नोव्हेंबरला आमदार अपात्र ते सह इतर मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या लढाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.