Supriya Sule: जनेतेचे प्रश्न थेट लोकसभेमध्ये..! काय आहे सुप्रिया सुळेंचा अनोखा फंडा?

| Updated on: Jul 07, 2022 | 5:30 PM

हा अभिनव उपक्रम राबविण्यामागे काय कारण याचा उलगडा देखील खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणूनच जनता आपल्याला निवडून देते. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हे शक्य आहे. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे.

Supriya Sule: जनेतेचे प्रश्न थेट लोकसभेमध्ये..! काय आहे सुप्रिया सुळेंचा अनोखा फंडा?
खा. सुप्रिया सुळे
Follow us on

मुंबई : दिवसेंदिवस (Social Media) सोशल मिडियाचा वापर हा वाढत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यादेखील सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असल्याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. आता याच सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आपले प्रश्न थेट (Loksabha) लोकसभेत मांडता यावेत असा फंडा सुळेंचा राहणार आहे. जनसामान्यांनी विचारलेले प्रश्न लोकसभेत मांडता यावेत यासाठी त्यांनी ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ ही वेबसाईट सुरु केली आहे. एका क्लिकवर नागरिक आपले प्रश्न हे त्यांच्यापर्यंत पाठविता येणार आहेत. तर त्यानंतर हेच प्रश्न त्या लोकसभेत उपस्थित करणार आहेत.

नेमकी कशी असणार प्रक्रिया?

जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडताना जनतेचा सहभाग आणखी वाढावा यासाठी त्यांनी ‘सक्रिय सहभाग आणि संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत नागरिक आपले प्रश्न, विषय, सुचना ‘आस्क मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट’ ( https://askme.supriyasule.net ) या वेबसाईटवरुन थेट सुळे यांच्यापर्यंत पाठवू शकतात. वेबसाइट ओपन केल्यानंतर नागरिकांना एक फाॅर्म भरावा लागेल. फाॅर्ममध्ये आपली माहिती आणि प्रश्न सविस्तर लिहिल्यानंतर प्रश्न पाठवता येणार आहे. त्यांतर तो प्रश्न खा. सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा एक एसएमएस देखील नागरिकांना मिळणार आहे. वाढती महागाई आणि सर्वसामान्यांची अवस्था काय झाली आहे. हे केंद्राच्या निदर्शानास आणून देण्याच्या अनुशंगाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

…म्हणून हा अभिनव उपक्रम सुरु

हा अभिनव उपक्रम राबविण्यामागे काय कारण याचा उलगडा देखील खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणूनच जनता आपल्याला निवडून देते. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून हे शक्य आहे. जनतेचा सहभाग यात वाढला पाहिजे या विचाराने हा एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यात स्वयंसेवी संस्था, नागरिक त्यांचे प्रश्न विचारू शकतात. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, सुचना, विषय मी संसदेत मांडण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न मांडावेत शिवाय या संवादाला आणखी मजबूत करण्यासाठी नागरिकांच्या अन्य काही सुचना असतील तर त्यांचेही स्वागत आहे”.असेही सुप्रिया सुळे ह्या म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

देशातील पहिलाच असा अभिनव उपक्रम

जनतेचे प्रश्न थेट लोकसभेत असा हा पहिलाच उपक्रम असणार आहे. शिवाय यामध्ये सहभागी होण्याची प्रक्रियाही सोपी असून सोशल मिडियाचा वाढता वापर यामुळे त्यांनी ही संकल्पना राबवली आहे. लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या व्यापक जनसंवादाला यामुळे चालना मिळणार आहे. या उपक्रमासाठी सहकार्य मिळेल असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.