पैसे देऊन सभेला गर्दीचा मुद्दा | संदिपान भुमरे या आरोपावर भरसभेत म्हणाले…आम्ही…

| Updated on: Sep 12, 2022 | 6:50 PM

दिवसाकाठच्या रोजाप्रमाणे सभेला हजर राहिले तर 250 रुपये अशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र, ही क्लिप बनवणारेही विरोधकांचेच कार्यकर्ते आणि व्हायरल करणारेही तेच आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने अशी कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे सभेवरुन करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन आहेत. त्याला कोणताही आधार नसल्याचे भुमरे यांनी स्पष्ट केले आहे.

पैसे देऊन सभेला गर्दीचा मुद्दा | संदिपान भुमरे या आरोपावर भरसभेत म्हणाले...आम्ही...
Follow us on

औरंगाबाद : पैठणमध्ये (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांची सभा होण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोपातून चर्चेची राळ उडाली होती. मात्र, संदीपान भुमरे हे आरोपांवर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. एवढचे काय सभेला काही आवधी असतानाच (S0cial Media) सोशल मिडियावर पैशाबाबत झालेल्या चर्चांचे देखील क्लिप व्हायरल झाल्या होत्या. मात्र, पैसे देऊन सभांना गर्दी करण्याची परंपरा ही विरोधकांची आहे. (Sandipan Bhumare) संदीपान भुमरे हा कायम जनतेमध्ये असलेला नेता आहे. त्यामुळे पैसे देऊन काही होत नाही तर गर्दी होण्यासाठी जनतेच्या मनात असणे गरजेचे असल्याचे भुमरे यांनी भर सभेत स्पष्ट केले आहे.

‘त्या’पत्राचेही स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अंगणवाडी आणि परिचारिकांना उपस्थित राहण्याचे शासन आदेशाचे पत्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडियामध्ये व्हायरल झाले होते. या पत्राबाबतही मंत्री संदीपान भुमरे यांनी खुलासा केला आहे. व्हायरल होत असलेल्या पत्रावर 10 फेब्रुवारी अशी तारिख आहे तर सभा ही 12 सप्टेंबर ला होत आहे. त्यामुळे हे विरोधकांचे षडयंत्र आहे. सभेची वेळ 2 ची तर पत्रामधील वेळ ही सकाळी 10 ची आहे.

अशी तयार झाली क्लिप..!

दिवसाकाठच्या रोजाप्रमाणे सभेला हजर राहिले तर 250 रुपये अशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र, ही क्लिप बनवणारेही विरोधकांचेच कार्यकर्ते आणि व्हायरल करणारेही तेच आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने अशी कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे सभेवरुन करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन आहेत. त्याला कोणताही आधार नसल्याचे भुमरे यांनी स्पष्ट केले आहे.

अंबादास दानवेंवर सडकून टीका

मंत्री झाल्यानंतर संदीपान भुमरे हे मतदार संघात दाखल होताच घेण्यात अलेल्या सभेत रिकाम्या खुर्च्याच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र, सदरील छायाचित्र हे सभेच्या ठिकाणची नव्हते तर पक्ष प्रमुखांना दाखवण्यासाठी केलेला खटाटोप होता. 50 नाही तर आजच्या सभेला लाखोंचा जनसागर असल्याचेही भुमरे म्हणाले आहेत.