मुंबई : ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटावरुन राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येतेय. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून भाजपच्या या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरच हल्ला चढवला होता. ‘हा सिनेमा भाजपच्या (BJP) माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान स्वत: त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका राऊतांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राऊत यांनी एक कार्टून ट्वीट करत बेळगावचा मुद्दा उपस्थित केलाय.
संजय राऊत यांनी ‘बेळगाव फाईल्स’ असं कॅप्शन देत एक कार्टून ट्वीट केलंय. जगदीश कुंटे यांच्या कार्टूनमध्ये बेळगावात मराठी माणसावर कशाप्रकारे अन्याय होतो. त्यात भाषिक गळचेपी, लोकशाहीची हत्या आणि मराठी तरुणांना दहशतीच्या वातावरणात ठेवण्याचे होणारे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत. ‘… आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत?’, असा खोचक सवाल विचारण्यात आलाय. कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील मराठी माणसावर अन्याय होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. शिवसेना सुरुवातीपासून हा मुद्दा मांडत आली आहे. तसंच शिवसेनेकडून बेळगावमधील प्रश्नावर सातत्यानं आंदोलनही करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी हे ट्वीट करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
बेळगाव फाईल्स… pic.twitter.com/F6OlDMIiSL
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 19, 2022
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. हा सिनेमा भाजपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान स्वत: त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्याचबरोबर ’32 वर्षापूर्वीचा आक्रोश, इतिहास, वेदना त्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचं कौतुक केलं पाहिजे. या सिनेमात अनेक सत्य दडपली आहेत. ताश्कंद फाईल हा सिनेमा त्याच निर्मात्याकडून प्रसिद्ध झाला आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं खापर एका कुटुंबावर फोडण्यात आलं. हा एक राजकीय अजेंडा या माध्यमातून राबवला जात आहे’, अशी टीका संजय यांनी केली.
इतर बातम्या :