जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. कारण खडसेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करा, असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने (National Women commission) जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना (Jalgaon Police) दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी खडसे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस या तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने याबाबत अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून, खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 2 सप्टेंबर 2017 रोजी मुक्ताईनगर इथे आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना अंजली दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या प्रकरणी अंजली दमानिया यांनी 7 सप्टेंबर 2017 रोजी विक्रोळी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान कुठलीही कार्यवाही होत नसल्याने अंजली दमानिया यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दिली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेत, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली होती. त्यावेळी दमानिया यांनी खडसेंच्या विधानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. तसंच सविस्तर पत्र लिहून फडणवीसांकडे तक्रार केली होती. खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती.
Mr @Dev_Fadnavis, hear this sick & disgusting language of your pervert BJP MLA & Ex Min Khadse. I demand immediate arrest under section 354 pic.twitter.com/x9mn3hwJZ0
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 5, 2017
संबंधित बातम्या
Eknath Khadse | राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपमधील गद्दार लोकं कळाली
माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच; नाथाभाऊंचा गंभीर आरोप
खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका : आमदार चंद्रकांत पाटील