लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम

| Updated on: Nov 02, 2020 | 9:28 PM

बिहारचे नवे मुख्यमंत्री तेजस्वी यादव असतील, असा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम
Follow us on

पाटणा : बिहारमध्ये 8 ते 10 जिल्ह्यांत मी गेलो. अनेक मतदारसंघात प्रचार केला. लोकांचा परिवर्तन करण्याचा मूड आहे. किती ताकदीने करतील ते पाहावे लागेल. लोकांना नितीशकुमार यांना बदलायचे आहे. नितीशकुमार जात आहेत. बिहारचे नवे मुख्यमंत्री तेजस्वी यादव असतील, असा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. (The Next Cm of Bihar is Tejashwi yadav Says Sanjay Nirupam)

पहिल्यांदाच बिहार जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडताना दिसतंय. तेजस्वी यादव यांना सवर्ण वर्गातून मोठा पाठिंबा मिळतोय. हिरण्यकश्यपू राक्षस होता, पण प्रल्हाद त्यांच्या घरी जन्माला आले, असं सांगत लालूप्रसाद यादव यांची चूक असू शकेल पण त्यांच्या घरी जो मुलगा जन्माला आला तो चांगला आहे, असं निरुपम म्हणाले. मी फक्त त्याचा काही भाग तुम्हाला सांगतोय माझं विधान कुणाला आक्षेपार्ह वाटू शकते, पण मला माफ करा. मी फक्त रेफरन्स देत आहे, असं सांगायला देखील निरुपम विसरले नाहीत.

“जे पारंपरिक आरजेडीविरोधी आहेत, त्या वर्गाच्या तरुणांमध्ये तेजस्वी प्रेरणा निर्माण करु पाहत आहेत तर ही बिहारच्या राजकारणात नवी गोष्ट होत आहे. तेजस्वी मोठ्या बहुमताच्या फरकाने जिंकतील”, असा विश्वासही निरुपम यांनी व्यक्त केला.

“तेजस्वींच्या धडाकेबाज सभांमुळे RJD जलदगतीने पुढे जातेय. त्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढायला मदत होईल. 122 चा बहुमताचा जादुई आकडा आम्ही नक्की पार करु, असा विश्वासही निरुपम यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसची 50 जागांवर अतिशय चांगली स्थिती आहे. यापैकी 30 आमदार निवडून येऊ शकतात”, असा दावा निरुपम यांनी व्यक्त केला

“गेल्या 15 वर्षात बिहारमध्ये एक नवा मतदार तयार झाला आहे. नितीशकुमार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि भाजपसोबत गेले तेव्हापासून प्रशासनावरचे त्यांचे नियंत्रण सुटले आहे. कायदा सुव्यवस्था नाही. बेरोजगारी वाढलीय. दारुबंदी असली तरी पूर्ण बिहारमध्ये नवे माफिया तयार झाले आहेत. लोकांमध्ये नितीशकुमार यांच्याबद्दल खूप राग आहे. तेजस्वी यादव नवतरुण लोकांना पर्याय वाटतो आहे.. तेजस्वी यांच्या सभांना होत असलेली गर्दी मतांमध्ये परावर्तित होईल”, असंही निरुपम म्हणलेा.

पुढे बोलताना ते म्हणाले, “काही वेगळं राजकीय समीकरण जुळून येईल असं वाटत नाही. RJD,काँग्रेस आणि अन्य साथीदारांचे 15 आमदार अश्या प्रकारे आम्ही बहुमताचा आकडा पार करुन महागठबंधनचे सरकार बनवू”.

“चिराग पासवान यांचा फार प्रभाव नाही पण ते जेडीयूचे मतदान कापत आहेत. त्यामुळे जेडीयूचे काही उमेदवार पडतील तसंच लोकजनशक्ती पार्टीचे काही उमेदवार जिंकतील, पण त्यांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज लागणार नाही कारण काँग्रेसकडे RJD चा कंदील आहे, तर चिरागची आवश्यकता कशाला?”, असंही निरुपम म्हणाले.

(The Next Cm of Bihar is Tejashwi yadav says Sanjay Nirupam)

संबंधित बातम्या

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!