बीड : (Rebel MLA) आमदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष संपेल अशी काहींची भावना होती. पण पक्ष अडचणीत आल्यानंतर पुन्हा दुपटीने उभारी घेत असल्याचे (Varun Sardesai) युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले आहे. तर कट्टर शिवसैनिकांमुळे पुन्हा पक्ष बांधणीचे प्रयत्न केले जात आहेत. (Beed) बीडमध्ये जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची ओळख ही शिवसैनिक म्हणूनच राहिलेली आहे. शिवाय ते विधानसभेच्या रिंगणातही उतरलेले आहेत. यावेळीही त्यांची तयारी असून महाविकास आघाडीच्या युतीमुळे जागेचे वांदे होणार आहे. असे असले तरी आपली निष्ठा कायम पक्षाशी आणि पक्षप्रमुखांशी असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शिवाय आपल्या नावातच दादा असल्याने येथे कोणीही दादागिरीची भाषा करु नये असे म्हणत त्यांनी आ. संजय गायकवाड यांना थेट इशाराच दिलेला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात आपला करिश्मा दाखवू शकली नसली तरी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वामुळे कायम दबदबा राहिलेला आहे. विधानसभा निवडणूकही त्यांनी यापूर्वी लढवली आहे. आता महाविकास आघाडीमुळे समीकरणे बदलली असून यंदा जर युती झाली तर मात्र, बीडची जागा ही राष्ट्रवादीलाच सुटली जाणार. पण असे असले तरी आपण पक्षाशी एकनिष्ठच असणार असे अनिल जगताप म्हणाले आहेत.
बीड मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार संघ आहे. त्यामुळे यंदा निवडणुकांची समिकरणे कशी राहतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. मात्र, राज्यातील 288 जागांवरही निवडणुक लढवण्याचे आदेश आले तर ती देखील तयारी असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले आहे. बीड येथे युवा सेनाचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदारांच्या बंडानंतही अनेक ठिकाणी शिवसैनिक निवडणुक लढविण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे पक्ष संपवण्याच्या उद्देशाने ज्यांनी गद्दारी केली त्यांचा हेतू साध्य होणार नसल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. निर्धार मेळाव्यात शिवसेनेशी एकनिष्ठतेचा निर्धार करण्यात आला आहे.
पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना शिवसेनेने सलग पाचवेळा उमेदवारी दिली होती. असे असताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनाच आव्हान दिले. पण जनता जागृत आहे. वेळ आली की या गद्दारांना त्यांची जागा दिसणारच आहे. पण ज्यांच्यामुळे राजकीय जीवन घडले त्यांच्याशीच गद्दारी करुन त्यांनी राजकीय स्वार्थ साधल्याचा आरोप युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले आहे.