मुंबई : (Amit Shah) केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दौरा गाजला तो त्यांनी केलेल्या शिवसेनेवरील टीकेवरुन. निमित्त लालबागच्या राजाच्या दर्शनाचे असले तरी मात्र, या संपूर्ण दौऱ्याला किनार होती ती, (Mumbai Municipal Election) मुंबई महापालिका निवडणूकांची. या दरम्यान, राजकारणात धोका देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे म्हणत अमित शाह यांनी एकप्रकारे (Shivsena) शिवसेनेला अव्हानच दिले आहे. शिवाय काहीही करुन यंदा मुंबई महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलणार असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र, खोके आणि धोके कोणी कुणाला दिले हे आता सबंध जनतेला माहित असल्याचे सांगत किशोरी पेडणेकर यांनी सत्तेसाठी भाजप कुठल्या स्तराला जाऊ शकते हेच सांगितले आहे.
अडीच वर्ष मुख्यमंत्री सेनेला यावरुन भाजप-सेनेमध्ये मतभेद झाले होते. असा निर्णय अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झाल्याचे शिवसेनेने वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, असा कोणता निर्णयच झाला नव्हता. असा दावा करणे म्हणजे धोका देणे आहे. राजकारणात धोके पत्करायचे म्हणजे पक्ष वाढीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे धोका देणाऱ्यांना माफी नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेलाच आव्हान दिले आहे.
भाजप पक्ष हा सत्तेसाठी कोणत्या स्थराला जाऊ शकतो हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यामध्ये समोर आले आहे. राज्यात दोन महिन्यापूर्वी घडलेले राजकीय नाट्य हे कशासाठी झाले ते सर्व जनतेला माहित आहे. खोके कोणी कोणाला दिले आणि धोका कुणाबद्दल झाला हे आता नव्याने सांगायची गरज नाही. कोण कोणाला धोखा देतोय कोण कोणाला खोके देतोय कोण कोणाचे बोके पळवतोय हे माहीत असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिकेवर वर्चस्व निर्माण करुन त्यांना त्यांची जागा दाखवा अशा सूचनाच अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी आवश्यक तेवढी मदत केली जाणार असल्यचेही ते म्हणाले आहेत. यावर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत शिवसेनेची प्रेमाची दहशत आहे. शिवाय गेल्या 25 वर्षापासून सेना मुंबईकरांची सेवा करीत आहे. त्यामुळे येथे दहशतीचा निभाव लागत नाही. एवढी वर्ष सत्ता असतानाही सेनेचे पाय हे जमिनीवरच आहेत? ते काय आम्हाला जमिन दाखवणार असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.