महाराष्ट्रतील सत्तासंघर्षाचा वाद पेटला! सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का तर शिंदे गटाला…

| Updated on: Sep 27, 2022 | 5:45 PM

सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का दिला आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रतील सत्तासंघर्षाचा वाद पेटला! सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का तर शिंदे गटाला...
Follow us on

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वाद चांगलाच पेटला आहे. निवडणुक कारवाई करण्यापासून थांबवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाला निर्णय घेऊ द्या असे निवडणूक आयोगाच्या वकीलाचे म्हणणे होते.  सुप्रीम कोर्टाने मोठा शिंदे गटाला सुप्रीम दिलासा दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या  कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

खरी शिवसेना कुणाची. शिवसेनेच चिन्ह धनुष्यबाण कुणाला द्यायचं  हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जे काही पुरावे दिलेत त्यावरून निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.