मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबात उद्या निकाल लागणार आहे. ११ वाजता निकाल वाचनला सुरुवात होणार. २० मिनिटांत निकाल वाचला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील शिंदे सरकार राहणार की कोसळणार, यावरती सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. हा घटनात्मक पेच कशा पद्धतीने सोडवला जातो, हे पाहावं लागेल. पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ हा निकाल देणार आहेत. उद्याचा हा निकाल ऐतिहासिक स्वरुपाचा असणार आहे. निकालाची शक्यता काय असेल ते आपण पाहुया.
सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे देऊ शकते. १६ आमदारांना पात्र ठरवल्यास हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी दिलासा ठरेल. खंडपीठ १६ आमदारांचा निकाल हा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे देऊ शकते. आमदार अपात्र ठरले तर १६ जणांमध्ये स्वतः शिंदे आहेत. त्यामुळे सरकार कोसळेल.
१६ आमदार अपात्र झाले तरी बहुमत शिंदे-भाजपकडे राहणार आहे. पुन्हा तेच बहुमत चाचणी जिंकू शकतात. राज्यपालांनी बोलावलेल्या बहुमत चाचणीची भूमिका खंडपीठ अयोग्य ठरवू शकते. तसे झाल्यास शिंदे-भाजप सरकारसाठी हा धक्का असेल. सरकारची निर्मितीच अवैध ठरेल.
निकालामुळे १६ आमदार अपात्र ठरल्यास शिवसेना कुणाची हा प्रश्न उद्भवेल. कारण तत्कालीन १६ आमदार हे शिवसेनेचेच आहेत हा दावा शिंदे गटाने केला आहे.
उद्या १६ आमदारांच्या पात्रतेबाबतचा निकाल येणार आहे. हे १६ आमदार पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ ठरवणार आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जणांचे लक्ष या निकालाकडे असणार आहे. आतापर्यंत ११ महिने सरकार चालले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे काय, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
या निकालाच्या बाबतीत काय घडेल, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. घटनातज्ज्ञही आपआपले मत व्यक्त करत आहे. पण, ही सर्व मतं आहेत, खरंच निकाल काय लागेल, हे सर्वोच्च न्यायालय उद्या ठरवेल. याचे वाचन सकाळी उद्या सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल.