Marathi News Politics The vote percentage of vanchit bahujan aghadi vba in maharashtra loksabha election 2019
वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला कुठे कुठे फटका?
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसला खाते उघडण्यासाठी शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने मदत केली. त्यामुळे तशा अर्थाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाल्यात जमा आहे, असा टोला भाजपने लगावला आहे. काँग्रेसच्या या अपयशामागे बरीच कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्वाचे कारण काँग्रेसला मित्रपक्षांना सोबत घेण्यात आलेले अपयश. वंचित बहुजन […]
Follow us on
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसला खाते उघडण्यासाठी शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने मदत केली. त्यामुळे तशा अर्थाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाल्यात जमा आहे, असा टोला भाजपने लगावला आहे. काँग्रेसच्या या अपयशामागे बरीच कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्वाचे कारण काँग्रेसला मित्रपक्षांना सोबत घेण्यात आलेले अपयश. वंचित बहुजन आघाडीला (VBA) सोबत न घेतल्याने काँग्रेस आघाडीला मोठे नुकसान झाल्याचं चित्र आहे.
काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत जागा वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 2014 च्या मोदी लाटेत निवडून आलेले खासदारही यावेळी पराभूत झाले. यूपीएच्या मतदानाची आकडेवारीही यावेळी घसरली. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेऊ शकल्याने महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला 15 ठिकाणी मोठा फटका बसला आहे. साधारण 8-9 ठिकाणी तर वंचितच्या मतांनी काँग्रेस उमेदवारांना विजयापासून दूर ठेवले. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम (AIMIM) यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीला जवळपास 14 टक्के मते मिळाली आहेत. तसेच औरंगाबाद येथील जागाही काबीज केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे असे 15 उमेदवार आहेत ज्यांना साधारण 90 हजार ते 3 लाखांपर्यंत मते मिळाली आहेत. या सर्व ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवात या मतांचा मोठा वाटा राहिला.
सांगली
विजयी – संजयकाका पाटील (भाजप) – 5 लाख 08 हजार 995
पराभूत – विशाल प्रकाशबापू पाटील (स्वाभिमानी + काँग्रेस) – 3 लाख 44 हजार 643
वंचितची मते – गोपीचंद पडळकर (वंबआ) – 3 लाख 00234
अकोला
विजयी – संजय शामराव धोत्रे (भाजप) – 5 लाख 54 हजार 444
पराभूत – हिदायतुल्लाह बराकातुल्लाह पटेल – 2 लाख 54 हजार 370
वंचितची मते – प्रकाश आंबेडकर – 2 लाख 78 हजार 848 मते
भाई बी. सी. कांबळे (बसप) – 7 हजार 780
हिंगोली
विजयी – हेमंत पाटील (शिवसेना) – 5 लाख 86 हजार 312
पराभूत – सुभाषराव बापूराव वानखेडे (काँग्रेस) – 3 लाख 8 हजार 456
वंचितची मते – मोहन राठोड (वंबआ) – 1 लाख 74 हजार 51
संदेश रामचंद्र चव्हाण (अपक्ष) – 23 हजार 690
डॉ. दत्ता मारोती धानवे (बसप) – 5 हजार 550
बुलढाणा
विजयी – प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) – 5 लाख 21 हजार 977
पराभूत – डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगे (काँग्रेस) – 3 लाख 88 हजार 690
वंचितची मते – बळीराम सिरस्कार (वंबआ) – 1 लाख 72 हजार 627
अब्दुल हाफिज अब्दुल अजिज (बसप) – 6 हजार 565
सोलापूर
विजयी – डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (भाजप) – 5 लाख 24 हजार 985
पराभूत – सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) – 3 लाख 66 हजार 377
वंचितची मते – बाळासाहेब आंबेडकर (वंबआ) – 1 लाख 70 हजार 7
नांदेड
विजयी – प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) – 4 लाख 86 हजार 806
पराभूत – अशोक शंकरराव चव्हाण (काँग्रेस) – 4 लाख 46 हजार 658
वंचितची मते – यशपाल भिंगे (वंबआ) – 1 लाख 66 हजार 196
नोटा (NOTA) – 6 लाख 114
अब्दुल रईस अहमद (आंबेडकर नॅशनल काँग्रेस) – 4 लाख 147
परभणी
विजयी – संजय हरिभाऊ जाधव (भाजप)– 5 लाख 38 हजार 941
पराभूत – राजेश उत्तमराव विटेकर (काँग्रेस) – 4 लाख 96 हजार 742
वंचितची मते – आलमगीर खान (वंबआ) – 1 लाख 49 हजार 946
कॉ. राजन क्षीरसागर (CPI) – 17 हजार 095
हातकणंगले
विजयी – धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना) – 5 लाख 85 हजार 776
पराभूत – राजू शेट्टी (स्वाभिमानी+काँग्रेस) – 4 लाख 89 हजार 737
वंचितची मते – अस्लाम सय्यद (वंबआ) – 1 लाख 23 हजार 419
लातूर
विजयी – सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप) – 6 लाख 61 हजार 495
पराभूत – मच्छिंद्र गुणवंतराव कामत (काँग्रेस) – 3 लाख 72 हजार 384
वंचितची मते – राम गरकर (वंबआ) – 1 लाख 12 हजार 255
गडचिरोली-चिमूर
विजयी – अशोक महादेवराव नेते (भाजप) – 5 लाख 19 हजार 968
पराभूत – डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी (काँग्रेस) – 4 लाख 42 हजार 442
वंचितची मते – रमेश गजबे (वंबआ) – 1 लाख 11 हजार 468
हरिचंद्र नागोजी मंगम (बसप) – 28 हजार 104
नोटा (NOTA) – 24 हजार 599
नाशिक
विजयी – हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) – 5 लाख 63 हजार 599
पराभूत – समीर भुजबळ (राष्ट्रवादी) – 2 लाख 71 हजार 395
वंचितची मते – पवन पवार (वंबआ) – 1 लाख 9 हजार 981
उस्मानाबाद
विजयी -ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर (शिवसेना) – 5 लाख 96 हजार 640
पराभूत – राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (काँग्रेस) – 4 लाख 69 हजार 74
वंचितची मते – अर्जुनदादा सलगर (वंबआ) – 98 हजार 579
नोटा (NOTA) – 10 हजार 24
यवतमाळ-वाशीम
विजयी – भावना पुंडलिकराव गवली (शिवसेना) – 5 लाख 42 हजार 98
पराभूत – माणिकराव ठाकरे (काँग्रेस) – 4 लाख 24 हजार 159
वंचितची मते – प्रविण पवार (वंबआ) – 94 हजार 228
वैशाली सुधाकर येडे (प्रहार जनशक्ती पक्ष) – 20 हजार 620
बीड
विजयी – प्रितम गोपीनाथ मुंडे (भाजप) – 6 लाख 78 हजार 175
पराभूत – बजरंग मनोहर सोनवणे (राष्ट्रवादी) – 5 लाख 9 हजार 807
वंचितची मते – विष्णू जाधव (वंबआ) – 92 हजार 139
रावेर
विजयी – रक्षा निखिल खडसे (भाजप) – 6 लाख 55 हजार 386
पराभूत – डॉ. उल्हास वासुदेव पाटील (काँग्रस) – 3 लाख 19 हजार 504
वंचितची मते – नितीन कांडेलकर (वंबआ) – 88 हजार 365
नोटा (NOTA) – 9 हजार 216
औरंगाबाद
विजयी – इम्तियाज जलिल (वंबआ) – 3 लाख 89 हजार 42
पराभूत : चंद्रकांत खैरे (शिवसेना) – 3 लाख 84 हजार 550