मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी अनौपचारिक गप्पादरम्यान, अनेक औपचारिक बाबी पत्रकारांसोबत शेअर केल्या. सत्तास्थापनेचा मुहूर्त, सत्तेचं गणित, शिवसेनेसोबत ठरलेले वादे, मुख्यमंत्री कोण याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, “पुढील 5 वर्ष आमचं सरकार स्थिर राहील. कोणी काही बोललं तरी चिंता करण्याचं कारण नाही. मी मिळालेल्या जागांवर खुश आहे. आम्ही फर्स्ट मेरिटमध्ये येणार होतो पण आम्ही फर्स्ट क्लासमध्ये आम्ही आलो”
मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल याबाबत काही शंका नाही. आमचा ए प्लॅन आहे त्यामुळे बी प्लॅनची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शपथविधी मुहूर्त ठरला नाही. पुढच्या आठवड्यात शपथविधी असू शकतो. सत्ता स्थापनेबाबत माध्यमांना सरप्राईज देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले.
#Maharashtra CM Devendra Fadnavis: I assure that this will be a BJP led government. https://t.co/8WioXU0qR0
— ANI (@ANI) October 29, 2019
पावसात भिजावं लागतं हा आमचा अनुभव कमी पडला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या भाषणावर तिरकस भाष्य केलं. भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार नाहीत. अनधिकृत आणि अधिकृत सेना -भाजप बैठक सुरु आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ठरलंच नाही
1995 चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद असे आश्वासन सेनेला कधीही दिलेले नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट केला.
शिवसेनेला पाचही वर्षाचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटू शकतं, पण वाटू शकणे आणि होणे यात फरक आहे, असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी लगावला.
सत्तास्थापनेचं गणित
भाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अनौपचारिक गप्पांमधील मुद्दे