देशात फक्त एकच मुद्दा, पुन्हा एकदा मोदी सरकार : अमित शाह

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : देशात सध्या फक्त एकच मुद्दा असून तो मुद्दा ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ हा असल्याचे मत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले. ते ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीच्या पदार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. यावेळी बोलताना शाह यांनी 2019 लोकसभा निवडणुकीपासून 2024 ला पंतप्रधान पदाच्या स्वतःच्या दावेदारीपर्यंत अनेक प्रश्नांची […]

देशात फक्त एकच मुद्दा, पुन्हा एकदा मोदी सरकार : अमित शाह
Follow us on

नवी दिल्ली : देशात सध्या फक्त एकच मुद्दा असून तो मुद्दा ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ हा असल्याचे मत भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले. ते ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या नव्या हिंदी वृत्तवाहिनीच्या पदार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित राष्ट्रीय संमेलनात बोलत होते. यावेळी बोलताना शाह यांनी 2019 लोकसभा निवडणुकीपासून 2024 ला पंतप्रधान पदाच्या स्वतःच्या दावेदारीपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

अमित शाह यांना 2024 मध्ये स्वतःच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘पक्षात माझ्यापेक्षा अनेक वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मी आदर करतो. हा मुद्दा कोणताही अँकर किंवा दर्शक ठरवू शकत नाही.’ उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर बोलताना शाह म्हणाले, ‘आमचा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये यावेळी 2014 पेक्षा अधिक जागा जिंकेल. उत्‍तर प्रदेशला मी जवळून ओळखतो. आता तिघे एकत्रित आहेत, अगदी चौघे जरी एकत्रित आले तरीही भाजपच्या जागा 73 वरून 74 होऊ शकतात, मात्र 72 होऊ शकत नाही.’ उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकींमध्ये झालेल्या पराभवावर बोलताना शाह म्हणाले, ‘पोटनिवडणुकीत लोक मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान निवडत नसतात. त्यावेळी वेगळे मुद्दे असतात.’

पश्चिम बंगालमध्ये भाजप 23 जागा जिंकेल

पश्चिम बंगालबाबत प्रश्न विचारला असता शाह म्हणाले, ‘भाजप तेथे खूप चांगले काम करेल. तेथे यावेळी संघटना ज्या स्थितीत आहे आणि ममता सरकारचे काम ज्या पद्धतीने सुरु आहे, त्यावरून तेथे आम्हाला लोकसभेच्या 23 जागा मिळतील, असा मला विश्वास आहे.’

आमच्यात खूप सहिष्‍णुता आहे

शिवसेना, ओमप्रकाश राजभर यांच्याकडून थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले, ‘तुम्हाला काय समजायचे ते समजा, मात्र आमच्यामध्ये खूप सहिष्णुता आहे.’

पाहा व्हिडीओ: