त्यांनी मतदान केलंच नाही, कॉंग्रेसने उचलला कळीचा मुद्दा, कुणाला घेरलं?

| Updated on: Nov 27, 2023 | 11:08 PM

देशात झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टद्वारे आलेल्या बॅलेट पेपरने मतमोजणीला सुरवात होणार आहे.

त्यांनी मतदान केलंच नाही, कॉंग्रेसने उचलला कळीचा मुद्दा, कुणाला घेरलं?
MADHYA PRADESH ELAECTION 2023
Follow us on

Madhya Pradesh Assembly elections 2023 | पाच राज्यातील निवडणुकासाठीचे मतदान संपले. निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीतील एका कॉंग्रेसने भाजपला घेरले आहे. मध्य प्रदेश राज्यात ही घटना घडलीय. कॉंग्रेसचे माजी मंत्री आणि पन्ना जिल्ह्यातील पवई विधानसभेचे काँग्रेस उमेदवार मुकेश नायक यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने ही तक्रार केलीय. पन्ना जिल्ह्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी 260 प्रवासी बस ताब्यात घेतल्या. 208 चारचाकी वाहने तैनात केली होती. पण. यात निष्काळजीपणा करण्यात आला असा आरोप भाजपने केलाय.

पन्ना आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या कामासाठी 260 प्रवासी बस आणि 208 चारचाकी वाहने तैनात करणायत आली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या या सर्व वाहनांचे चालक आणि वाहक मतदान करू शकले नाहीत. असा आरोप कॉंग्रेसने केला. वारंवार मागणी करूनही त्यांच्या मतदानासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच, अचानक ड्युटीवर रुजू झालेल्या शिक्षक यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.

निवडणुकीच्या कामात मदतीसाठी तीनशेहून अधिक शिक्षकांना अचानक ड्युटी लावण्यात आली. वाहन चालक, वाहक आणि शिक्षक यांच्या मतदानासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यापासून ते वंचित राहिले. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही असाच प्रकार घडला आहे. यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे माजी मंत्री नायक म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये नोंदवलेल्या मतांची मोजणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 14 टेबले लावण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार मतमोजणी टप्पा ठरविण्यात येणार आहे. तर, पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असेल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

प्रत्येक फेरीच्या मोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय वेबकास्टिंगद्वारे सर्व 52 जिल्हा मुख्यालयातील मतमोजणीवर लक्ष ठेवून असेल. जिल्हा मुख्यालयातच मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून व्यवस्था करण्यात येत आहे. एका मतदान केंद्रातील वापरल्या जाणार्‍या ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांची मोजणी एकावेळी एका टेबलवर होईल. त्यानंतर दुसऱ्या मशीनमध्ये नोंद झालेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निवडणूक अधिकारी आकडेवारी जाहीर करतील. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मतमोजणीची अंतिम फेरी होणार नाही असेही त्यांनी सांगितले.