Prataprao Jadhav : ‘डूबते को तिनके का सहारा’.. सत्तेसाठी ते एमआयएमसोबत ही युती करतील, खासदार प्रतापराव जाधव यांची जहरी टीका..कोणावर साधला निशाणा..

| Updated on: Nov 29, 2022 | 9:03 PM

Prataprao Jadhav : चिखली येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी ही पलटवार केला आहे..

Prataprao Jadhav : डूबते को तिनके का सहारा.. सत्तेसाठी ते एमआयएमसोबत ही युती करतील, खासदार प्रतापराव जाधव यांची जहरी टीका..कोणावर साधला निशाणा..
खासदार जाधवांची जहरी टीका
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

बुलढाणा : सध्या उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) गटाची अवस्था ‘डूबते को तिनके का सहारा’ अशी झाल्याचा पलटवार खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची चिखलीतील जाहीर सभा चांगलीच गाजली. त्यात त्यांनी खासदार भावना गवळीसह शिंदे गटात (Shinde Group) गेलेल्या आमदार-खासदारांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर आता बुलढाण्याचे खासदार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी भीमशक्ती-शिवशक्ती एकत्रीकरणाची हाक दिली आहे. तर प्रकाश आंबडेकर यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या काळात भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग राज्यातील निवडणुकीत काय प्रभाव दाखवितो, हे समोर येईल.

या युतीवर शिंदे गटात दाखल झालेले खासदार जाधव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) सह एकत्रित निवडणूक लढवली होती. त्याचा काय परिणाम झाला, याची आठवण खासदार जाधव यांनी करुन दिली.

हे सुद्धा वाचा

‘उबाठा’ सेनेची नौका आता बुडायला लागली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची आता आघाडी, युतीसाठी केविलवाणी धडपड सुरु असल्याची टीका त्यांनी केली. कधी, काँग्रेस-राष्ट्रवादी तर आता वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची धडपड सुरु असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

तर वेळ पडल्यास, सत्तेसाठी, स्वार्थासाठी उद्धव ठाकरे गट मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन – एमआयएमसोबतही युती करेल, अशी जहरी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाकयुद्ध अजूनही धुमसत असून, गद्दार या शब्दाने राज्यातील राजकारणात मोठा भूंकप आणला आहे. तर शिंदे गटातील आमदार, खासदारही त्याला जोरदार प्रतित्यूत्तर देत असल्याचे दिसून येत आहे.