मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाची (Cabinet) आज बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ही शेवटची बैठक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मला माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली, असंही ठाकरे म्हणाले. पाच वर्षे हे सरकार चालणार असं म्हटलं होतं. पण, माझ्या सहकाऱ्यांनी मला दगा दिला. त्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, असे भावनिक उद्गार यावेळी त्यांनी काढले. उद्या बहुमत चाचणीला (Majority Test) महाविकास आघाडीला सामोरं जावं लागणार आहे. शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Court) सुनावणी सुरू आहे. तिथं काय होत याकडं सर्वांच लक्ष लागलंय. याठिकाणी थोडाफार वेळ शिवसेनेला मिळू शकतो. परंतु, न्यायालय काय निर्णय घेतो, यावर सर्व अवलंबून असेल. उद्या बहुमत चाचणी झाली तर तो महाविकास आघाडीसाठी कठीण दिवस असेल.
मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे मंत्रालयात आले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले. महापुरुषांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले. त्यानंतर ते मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी गेले. मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, असं त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना म्हटलं. या त्यांच्या वक्तव्यावरून ही त्यांची शेवटची कॅबिनेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी भावनिक आवाहन केले. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं. त्याबद्दल धन्यवाद, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. यावेळी सगळे सचिव उपस्थित होते. त्यामुळं तात्काळ काही महत्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातो का, हे बघणं महत्त्वाच ठरणार आहे.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा काही महत्त्वाचा नाही. बहुमत चाचणी लोकशाही मजबूत करणारी गोष्ट आहे. सदस्यांची अपात्रता हा मुद्दा नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. बहुमत चाचणी ही लोकशाही मजबूत करणारी गोष्ट आहे, असं अॅड. कौल यांनी म्हटलंय. त्यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. शिवसेनेच्या वतीनं अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. संविधानात काही तरतुदी आहेत. असं कोर्टानं म्हटलं, त्यावर सिंघवी म्हणाले, फ्लोअर टेस्ट बहुमत आहे की नाही, यासाठी घेतले जाते. त्यात मतदान करण्यासाठी कोण योग्य कोण अयोग्य याकडंही लक्ष दिलं गेलं पाहिजे.