Lok Sabha : ‘त्या’ 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या

| Updated on: Jul 19, 2022 | 5:49 PM

12 खासदारांनी आता शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आता आपली काय भूमिका असणार हे स्पष्ट केले आहे. यापुढे मुख्यमंत्री यांच्या समवेत कामे केली जाणार आहेत. याबाबत भेटी दरम्यान चर्चा झाली असून विकास कामांबाबतही चर्चा झाली आहे. शिवाय आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली जाणार आहे. भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप वेळ मिळालेली नाही.

Lok Sabha : त्या 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या
12 खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
Follow us on

मुंबई :  (Shiv sena) शिवसेनेतील 12 खासदार हे आता (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी झाले असून आपल्या गटाची काय भूमिका आहे हे देखील त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच (Lok Sabha Speaker) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र गटासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्याची मागणी देखील लवकरच होईल असा त्यांना विश्वास आहे. यासंदर्भात 12 खासदारांनी पत्र लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदारांनी पुढची रणनिती ठरविल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहेत ‘त्या’ तीन मागण्या?

शिवसेनेतून बंडखोरी करीत शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये राहुल शेवाळे यांना लोकसभेचे गटनेते करा, संसद भवनामध्ये नवीन कक्ष कार्यालय या गटाला द्यावे तसेच पक्षप्रतोद म्हणून भावना गवळी यांच्या नावाचे पत्र दिले आहे. त्यालाही लोकसभा अध्यक्षांनी मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्र्यासोबत काम करणार

12 खासदारांनी आता शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आता आपली काय भूमिका असणार हे स्पष्ट केले आहे. यापुढे मुख्यमंत्री यांच्या समवेत कामे केली जाणार आहेत. याबाबत भेटी दरम्यान चर्चा झाली असून विकास कामांबाबतही चर्चा झाली आहे. शिवाय आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली जाणार आहे. भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप वेळ मिळालेली नाही. यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असून या स्वतंत्र गटाची भूमिकाही स्पष्ट केली जाणार आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी शिंदे गटात सहभाग नोंदवल्यापासून राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर हालचाली वेगात

कालपर्यंत शिवसेनेत असलेले खासदार आता शिंदे गटात सहभागी झाले आहे. शिवसेनेतील 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ भेटच घेतली नाहीतर त्यांचा सत्कारही केला आहे. मंगळवारी याच बारा खासदारांना घेऊन मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान, खासदारांच्या वतीनेही या निर्णयामागचे कारण समोर येईल असा आशावाद आहे. यामध्ये भावना गवळी, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, प्रताप जाधव, कृपाल तुमाणे, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.