सातारा : अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या काही जणांना अजूनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडतात, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना नाव न घेता लगावला. विधानसभेच्या तोंडावर जयकुमार गोरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती धरला. साताऱ्यातील माण खटावचे ते आमदार आहेत. (Balasaheb Thorat taunts BJP MLA Jaykumar Gore about dreaming of ministry)
सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालायात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस बळकट होत चालल्याचा विश्वास व्यक्त केला.
“अडचणीच्या काळात काँग्रेसला सोडून मंत्रिपदाची स्वप्न बघत काही मंडळी भाजपमध्ये गेली. मात्र अजूनही त्यांना मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडत आहेत” असं थोरात जयकुमार गोरेंना अप्रत्यक्षपणे म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांचे काम राष्ट्रीय स्तरावरचे असून ते खासदार झाले पाहिजेत, अशी इच्छाही थोरांतांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली.
…म्हणून आम्ही शिवसेनेसोबत हातमिळवणी केली : पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपवर हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील अनेकांना कोंडीत पकडून, केसेसची भीती दाखवत पक्ष फोडला असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.
शिवसेनेसेविषयी बोलताना चव्हाण म्हणाले की, शिवसेना या पक्षाविषयी निर्णय घेणे सर्वांसाठी थोडे अडचणीचे होते, परंतु भाजपातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष फोडून लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. (Balasaheb Thorat taunts BJP MLA Jaykumar Gore about dreaming of ministry)
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील अनेक बडे नेते पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेले होते. त्यामध्ये जयकुमार गोरे हेदेखील होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील सभेदरम्यान जयकुमार गोरे यांना मंत्रिपद देण्याचं जाहीर आश्वासन दिलं होतं. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं तर भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसावं लागलं आहे.
शाह-फडणवीस गुरुचेल्याने दोन्ही काँग्रेसचे 40 नेते फोडले, विलासकाका उंडाळकरांनाही आमिष, पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट https://t.co/iygJwr9jOW @prithvrj @AmitShah @Dev_Fadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
संबंधित बातम्या
Balasaheb Thorat | आजचा दिवस अविस्मरणीय, काका-बाबा एकत्र, हे राज्यासाठी दिशादर्शक : बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat | सुंदर भाषणातून योग्य तडाखे, उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं बाळासाहेब थोरातांकडून कौतुक
बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राचे काय? बाळासाहेब थोरातांचा भाजपला सवाल
(Balasaheb Thorat taunts BJP MLA Jaykumar Gore about dreaming of ministry)