ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) दिवाळीच्या जवळपास होऊ शकते. पण, आधीच शिवसेनेत (Shiv Sena) दोन गट पडलेत. त्यामुळं निवडणुकीचे फटाके कोणत्या गटात फोडायचे असा प्रश्न उभेच्छुकांना पडला आहे. निवडणूक घोषित झाल्यानंतर यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल. सध्यातरी बहुतेक नगरसेवक (Corporator) शिंदे गटात सहभागी आहेत. त्यामुळं ठाण्यात तरी शिंदे गटाचं पारडं जड आहे. शिवसेनेच्या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग करेल. नवे चिन्ह घेऊन निवडणूक लढण्याची हिंमत फार कमी जण करतात. गेल्यावेळी चार नगरसेवक एका गटात निवडून आले होते. यावेळी एका प्रभागातून तीनच नगरसेवक निवडून येणार आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल.
ठाणे महापालिका प्रभाग 26 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
ठाणे महापालिकेतून 142 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 71 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून अनिता किणे, दीपाली भगत, यासीन कुरैशी व विश्वनाथ भगत हे निवडून आले होते. यावेळी प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. प्रभाग 26 मधून अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. डॉ. विपिन शर्मा हे ठाणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आहेत.
ठाणे महापालिका प्रभाग 26 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
किसननगर क्रमांक 1, पडवळनगर, रतनबाई कंपाउंड. रोड क्रमांक 16 वरील सनराईज बिल्डिंगपासून पूर्वेकडे रस्त्याने विकास तुंबे हाऊसपर्यंत त्यानंतर उत्तरेकडे पाईपलाईनने शंभूनाथ गुप्ता हाऊसपर्यंत आणि त्यानंतर पश्चिमेकडे एसएसई अभियंते आणि सल्लागारांपर्यंत. एस.जी. बर्वे आणि एलबीएस रोडच्या जंक्शनपासून पश्चिमेकडे एलबीएस रोडने मुलुंड चेक नाक्यापर्यंत. त्यानंतर नाल्याद्वारे सार्वजनिक शौचालयासमोर, अमरप्रेम सोसायटी. पश्चिम – सार्वजनिक सोसासयीसमोरून, अमरप्रेम सोसायटी रोड क्रमांक 16 द्वारे उत्तरेकडं सूर्योदय इमारतीपरंयत. पूर्व – शिवनेरी सोसायटी दरम्यानच्या लेनने यशवंत सोसायटी, ज्ञानेश्वर सदन, गणराज अपार्टमेंट, विमल कुंज, एकवीरा दर्शन श्रीनगर पोलीस चौकीपर्यंत.
ठाणे महापालिका प्रभाग 26 क
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 1 लाख 26 हजार 3, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 698 आहे. प्रभाग 26 ची लोकसंख्या 40 हजार 243 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 1 हजार 834 तर अनुसूचित जमातीची 470 आहे.