Eknath Shinde : 10 वाजता एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची बैठक! ‘या’ 2 गोष्टी ठरवल्या जाण्याची शक्यता

| Updated on: Jun 23, 2022 | 9:14 AM

आज दहा वाजता एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पुढील रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Eknath Shinde : 10 वाजता एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची बैठक! या 2 गोष्टी ठरवल्या जाण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : आज दहा वाजता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पुढील रणनिती काय असावी हे ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांना आमदारांचा पाठिंबा वाढतच असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या भावनिक आवाहानंतर देखील आज सकाळी तीन आमदार (MLA) एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या तीन आमदारांची नावे समोर येऊ शकलेली नाहीत. आपल्याला 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पुढील रणनिती काय असवी? सत्ता स्थापनेसाठी कोणासोबत जावे? अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेवर दावा

आज एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची जी बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये शिवसेना हा मुळ पक्ष तसेच त्याचे चिन्ह धनुष्यबाण हे आपल्याकडे कसे येईल यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे त्यासाठी आधीपासूनच एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कायदेशिर दृष्ट्या शिवसेनेवर दावा कसा केला जाऊ शकतो? याच्या सर्व शक्यता एकनाथ शिंदे गटाकडून आजमवल्या जात आहेत. शिवसेनेवर दावा सिद्ध झाल्यास ज्या आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे, ते आमदार बंडखोर नसून तेच खरे शिवसैनिक आहेत हे सिद्ध करता येणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपाची देखील मदत होत असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती नाही

या बैठकीमध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. ती म्हणजे सत्ता स्थापण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचे नाही. तसे संकेत या आगोदरच एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये देखील राष्ट्रवादी, काँग्रेसोबत असलेली आघाडी तोडण्यात यावी असे म्हटले होते. गेल्या अडची वर्षांमध्ये फक्त घटक पक्षांचाच विकास झाला, मात्र सामान्य शिवसैनिकांकडे दुर्लक्ष झाल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. आज या बैठकीमध्ये याच दोन मुद्द्यावंर चर्चा होण्याची शक्यता आहे.