मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. मात्र सुनावणीसाठी नेताना संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मागच्या सुनावणीवेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केलेल्या काही वक्तव्यांची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे यावेळी पोलिसांकडून विशेष खबऱदारी घेण्यात आली आहे. संजय राऊत यांना कोर्टात नेण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. सोबतच अर्थर रोड कारागृहाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यांना सुनावणीसाठी थोड्याचवेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मागच्या काही सुनावणीवेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे आता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. संजय राऊत यांना कोर्टात नेण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अर्थर रोड कारागृहाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सध्या सजंय राऊत हे पत्राचाळ प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीत गेल्यावेळी वाढ करण्यात आली होती. आज तरी संजय राऊत यांना जामीन मिळणार का ? की पुन्हा कोठडीत वाढ होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.