[svt-event title=”पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश” date=”13/11/2019,10:20PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश, मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश [/svt-event]
[svt-event date=”13/11/2019,7:20PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द, अजित पवार यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”सुधीर मुनगंटीवार आणि मोहन भागवत यांच्यात 20 मिनिटे चर्चा” date=”13/11/2019,6:09PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सुधीर मुनगंटीवार आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट, तब्बल 20 मिनिटे चर्चा, भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची मुनगंटीवारांचा माहिती [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : हेमंत गोडसे” date=”13/11/2019,5:35PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री हा सेनेचाच होणार, चर्चा सकारात्मक झाली असून लवकर निर्णय जाहीर होणार, अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरे घेतील आणि तेच जाहीर करतील- शिवसेना खासदार हेमंत गोडसे [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार! ‘लीलावती’तून डिस्चार्जनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया” date=”13/11/2019,12:50PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/G3NznxobER
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2019
[svt-event title=”समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 नावं” date=”13/11/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावं, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”संजय राऊतांची भूमिका जनतेला आवडली : बाळासाहेब थोरात” date=”13/11/2019,12:12PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांची तब्येत बरी आहे, राऊतांनी शिवसेनेची बाजूने लावून धरली, संजय राऊतांची भूमिका जनतेला आवडली – बाळासाहेब थोरात https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/vJFkkEZt0m
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2019
[svt-event title=”मध्यावधी निवडणुका लागणार नाही : शरद पवार ” date=”13/11/2019,11:47AM” class=”svt-cd-green” ] मध्यावधी निवडणुका लागणार नाही, भीती बाळगू नका, असं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत सांगितले. मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळण्यात आली आहे. तसेच मतदारसंघात जाऊन लोकांना भेटा, त्यांचे आभार माना, असं पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सांगितले. [/svt-event]
[svt-event title=”आदित्य ठाकरेंचा रात्रीपासून रीट्रीट हॉटेलमध्ये मुक्काम” date=”13/11/2019,11:40AM” class=”svt-cd-green” ] आदित्य ठाकरे काल रात्रीपासून रीट्रीट हॉटेलमध्ये ठाण मांडून आहेत. हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे लक्ष, सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत सर्व आमदार हॉटेलमध्ये थांबणार. [/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही” date=”13/11/2019,10:37AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही, सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील याचिका [/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक” date=”13/11/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सुप्रिया सुळे वाय. बी. चव्हाण सेंटरला रवाना झाल्या आहेत. [/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात भेट : सूत्र ” date=”13/11/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांची भेट, सूत्रांची माहिती, सत्तास्थापनेबाबत काल रात्री चर्चा झाल्याची शक्यता https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/dhH9p269b0
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2019
[svt-event title=”शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी” date=”13/11/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ]
शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सकाळी 10.30 वाजता सुनावणी, सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2019
[svt-event title=” भाजपकडून मध्यावधी निवडणुकीची तयारी?” date=”13/11/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ]
भाजपकडून दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका, भाजप कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रावर मध्यावधी निवडणुका लादू इच्छित नाही : रावसाहेब दानवे https://t.co/eIKj4Eop7R @raosahebdanve pic.twitter.com/f4kxzmiZaC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2019
[svt-event title=”भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक” date=”13/11/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या नव्या आमदारांची उद्या (14 नोव्हेंबर) बैठक घेण्यात येत आहे. ही बैठक संघध्याकाळी 7 वाजता होणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस या बैठकीत सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. [/svt-event]