मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 288 मतदारसंघात 1504 उमेदवारांनी अर्ज (Maharashtra vidhansabha total candidates) माघारी घेतले. यानंतर आता एकूण 3239 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 246 उमेदवार निवडणुकीत (Maharashtra vidhansabha total candidates) आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
शनिवारी झालेल्या छाननीअंती 4743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1504 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार?
सर्वात कमी आणि सर्वात जास्त उमेदवार असलेले मतदारसंघ
सर्वात कमी 3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात आहेत, तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार आहेत.
नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयू) आवश्यकता असेल. तर कंट्रोल युनिट (सीयू) एकच लागणार आहे.
30 मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार
अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. राज्यात ईव्हीएमच्या सर्वोच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा उमेदवारांची संख्या कमी असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.