मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघामध्ये एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दाखल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल होती. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतरच्या अंतिम यादीत 249 उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. अंतिम यादीतील उमेदवारांची मतदारसंघ निहाय संख्या पुढील प्रमाणे,
जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23), रायगड (16), पुणे (31), बारामती (18), अहमदनगर (19), माढा (31), सांगली (12), सातारा (9), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15), हातकणंगले (17)
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तसेच 6, 12 आणि 19 मे अशा 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.
पाहा व्हिडीओ: