मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 53.13 टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात 55.36 टक्के, चंद्रपूर – 55.97 टक्के, रामटेक – 55.61 टक्के, भंडारा-गोंदिया – 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात 61 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी भरघोस मतदान झालं होतं.
2014 च्या मतदानाची आकडेवारी आणि विजयी उमेदवार
वर्धा : 64.79 टक्के (भाजपचे रामदास तडस विजयी)
रामटेक : 62.64 टक्के (शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी)
नागपूर : 57.12 टक्के (भाजपचे नितीन गडकरी विजयी)
भंडारा-गोंदिया : 72.31 टक्के (भाजपचे नाना पटोले विजयी)
गडचिरोली-चिमूर : 70.04 टक्के (भाजपचे अशोक नेते विजयी)
चंद्रपूर : 63.29 टक्के (भाजपचे हंसराज अहीर विजयी)
यवतमाळ-वाशिम : 58.87 टक्के (शिवसेनेच्या भावना गवळी विजयी)
2019 ची आकडेवारी (5 वाजेपर्यंत)
नागपूर : 58 टक्के
रामटेक : 60 टक्के
चंद्रपूर : 68 टक्के
गडचिरोली-चिमूर : 72 टक्के
भंडारा-गोंदिया : 71 टक्के
वर्धा : 65 टक्के
यवतमाळ-वाशिम : 62 टक्के