मुंबई : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल, चिरफाड अतिशय सोप्या भाषेत महाराष्ट्राच्या जनतेला उद्या सरकारच्यावतीने करुन देऊ, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. (Anil Parab on Devendra Fadnavis package) देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती पैसा पुरवला याची सविस्तर मांडणी केली. त्याला आता सरकारकडून उत्तर देण्यात येईल”, असं अनिल परब यांनी सांगितलं.
अनिल परब म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला मोठे आर्थिक सल्ले दिले. महाराष्ट्र सरकारने काय करायला हवं, कशी उपाययोजना करायला हवी, याबद्दल फार मोठं मार्गदर्शन महाराष्ट्राला केलं. परंतु हे करत असताना, त्यांनी हा विचार करायला हवा की महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळतं असं नाही. जे सरकारमध्ये बसलेले आहेत, त्यापैकी बरेच लोक अर्थशास्त्र जाणतात. सरकार कसं चालवायचं, कसं चालतं, सरकारला काय करता येतं याची सर्व जाणीव सरकारला आहे. फडणवीसांनी वेगवेगळे विषय असे मांडले, की महाराष्ट्र सरकारला काहीच कळत नाही, जे काही समजतंय ते आम्हालाच समजतंय आणि आमच्या सल्ल्याने सरकार चाललं तरच सरकार चालेल आणि महाराष्ट्राची जनता कोरोनामुक्त होईल. अन्यथा महाराष्ट्र सरकार फार मोठ्या संकटात सापडेल, अशा प्रकारचे वक्तव्य केलं. (Anil Parab on Devendra Fadnavis package)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल, चिरफाड अतिशय सोप्या भाषेत करु : परिवहन मंत्री अनिल परब @advanilparab @dineshdukhande pic.twitter.com/lmH7k1Yx9u
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2020
मी फक्त एवढंच सांगू इच्छितो. महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने काम करतंय. मुख्यमंत्री अहोरात्र काम करुन तज्ज्ञांशी संवाद साधून या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. राहिला प्रश्न आज जी फडणवीसांनी आकडेवारी दिली, त्या आकडेवारीची पोलखोल आणि चिरफाड उद्या सोप्या भाषेत करुन देऊ. लोकांना मूर्ख समजू नका, लोकांना हे कळतंय ही राजकारणाची वेळ नाही. अर्थगणित सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका, असं अनिल परब म्हणाले.
(Anil Parab on Devendra Fadnavis package)
संबंधित बातम्या
राज्याला जीएसटीचे पैसे का मिळाले नाहीत? देवेंद्र फडणवीस म्हणतात…