मतदानाच्या धामधुमीत धनंजय मुंडेंसाठी दिल्लीतून मोठं वृत्त, जमीन घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

| Updated on: Oct 21, 2019 | 11:37 AM

राज्यभरात मतदानाची धावपळ आणि परळीतील राडेबाजीप्रकरण ताजं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा देणारं वृत्त राजधानी दिल्लीतून आलं आहे.

मतदानाच्या धामधुमीत धनंजय मुंडेंसाठी दिल्लीतून मोठं वृत्त, जमीन घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : राज्यभरात मतदानाची धावपळ आणि परळीतील राडेबाजीप्रकरण ताजं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा देणारं वृत्त राजधानी दिल्लीतून आलं आहे. बेलखंडी मठ जमीन गैरव्यवहार म्हणजेच जगमित्र साखर (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde)  कारखाना घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यांचा दिलासा दिला आहे. (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde)  पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनंजय मुंडेंच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली होती. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबर म्हणजे आज मतदानाच्या दिवशी ठेवली होती. मात्र आता ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर धनंजय मुंडे पुन्हा एकदा परळी मतदारसंघातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. बहीण आणि भाजपच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात ते उभे ठाकले आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होत असतानाच जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा झाल्याच्या आरोपातही त्यांचा निकाल (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde) येण्याची चिन्हं होती.

जगमित्र साखर कारखाना प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde) 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवलही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.

या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.

पुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही.

रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचं सांगत त्यांनी उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. फड यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात (Jagamitra Sugar Mill Dhananjay Munde) गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश शासनाला देण्याची विनंती केली होती.

संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट : धनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाकडून खरंच दिलासा मिळालाय का?   

आरोपी क्रमांक 10… धनंजय मुंडेंविरोधात ‘420’चा गुन्हा दाखल  

जमिनींचं खरेदीखत गुन्हा असतो, कारस्थान नाही, धनंजय मुंडेंना धस यांचं उत्तर 

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर