Uday Samant : रिक्षावाला पानवाला यांच्यासाठी शिंदे गट नव्या योजना राबिवणार, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला

| Updated on: Jul 19, 2022 | 4:36 PM

आमदारांनी शिवसेना का सोडली यांची सुद्धा कारणे रामदास कदम यांनी सांगितली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली.

Uday Samant : रिक्षावाला पानवाला यांच्यासाठी शिंदे गट नव्या योजना राबिवणार, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला
रिक्षावाला पानवाला यांच्यासाठी शिंदे गट नव्या योजना राबिवणार, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय घडामोडी अत्यंत जलदगतीने घडत आहेत. त्यामुळे रोज कायतरी नवीन कानावर पडतं आहे. आज देखील राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आज रामदाम कदम यांनी माध्यमांच्या समोर त्यांची व्यथा मांडली. शिंदे गटाचा उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) गटाला मास्टर स्ट्रोक मारला आहे. रिक्षावाला, पानवाला , वेश्या अशा शब्दात शिवसेना नेत्यांकडून टीका सोसल्या यांचं घटकासाठी योजना राबविणार असल्याचं शिंदे गटाने जाहीर केलं आहे. रिक्षा चालकांसाठी रिक्षा चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले जाणार आहे. पानपट्टी वाला आणि वोचमन आणि शरीर विक्री करणाऱ्या करणाऱ्या अशा घटकासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.

आमदारांनी शिवसेना का सोडली

आमदारांनी शिवसेना का सोडली यांची सुद्धा कारणे रामदास कदम यांनी सांगितली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली. त्यावेळी रामदास कदम यांनी त्यांच्याबाबत जे घडल त्या व्यथा मांडल्या आहेत. सुप्रीम कोर्टबाबत असं वक्तव्य कुणी करू नये, संजय राऊत यांनी टीका केली म्हणून मी त्यावर काही बोलणार नाही. या सर्व वक्तव्याचा परिपाक आजची रामदास कदम यांची मुलाखत आहे असही उदय सामंत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय म्हणाले उदय सामंत

रामदास कदम यांनी त्यांच्याबाबत जे घडलं ते मीडियासमोर मांडलं आहे. सुप्रीम कोर्टबाबत असं वक्तव्य कुणी करू नये असं म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना टोला लगावला. संजय राऊत यांनी टीका केली म्हणून मी त्यांना उत्तर देणार नाही. या सर्व वक्तव्याचा परिपाक आजची रामदास कदम यांची मुलाखत आहे. किरण साळी यांना बढती देण्यात आली आहे . एकनाथ शिंदे कुणाची हकालपट्टी करत नाही तर बढती देण्याचे काम करत आहेत असा टोला सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 12 खासदारांनी जी भूमिका घेतली ती आम्ही आमदारांनी देखील घेतली. आमदारांनी शिंदे यांची खऱ्या शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका स्वीकारली आहे.