मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उध्दव ठाकरे यांचं स्थान कुठे होते सगळ्यांना माहीत आहे . भाजप आपला पारंपरिक विरोधक असल्यासारखे उध्दव ठाकरे वागत आहेत, असं उदय सामंत म्हणालेत.
कर्नाटकात काँग्रेसला यश मिळालं मात्र काहींना इकडे स्वप्न पडायला लागली आहेत. विधासभा आणि लोकसभेत महाविकस आघाडीची सत्ता येईल, अशी स्वप्न ही लोकं बघत आहेत. राजस्थानचे उदाहरण तुम्हाला माहीत आहे . महाराष्ट्र पुरता बोलायचं झालं तर नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती जगजाहीर आहे. त्यामुळे जनता ही आमच्याच बाजूने उभी राहिल, असं उदय सामंतांनी म्हटलं आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न विचारला असता, लवकरच यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्यवेळी याबाबत निर्णय घेतील. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं उदय सामंत म्हणालेत.
विधानसभेच्या अध्यक्षांवर विरोधक वाटेल ते टीका टिप्पणी करत आहेत. नरहरी झिरवळसाहेब तर म्हणातत मी 16 आमदारांना थेट अपात्र करेल… निवडणूक आयोग आम्हाला न्याय देईल , आम्ही तर सर्व कागदपत्र दिली आहेत. तरी आयोगाने शिवसेना कोण हे याचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे आता सिद्ध झालं आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय.
सकाळी 9.30 वाजता एक शो सुरू होतो आणि जनेतेला वेडे बनवायचं काम केलं जातं, असं म्हणत उदय सामंतांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.
कर्नाटकात आता काँग्रेसचं सरकार येईल. आता पुढं प्रश्न सोडवतात का? हे आम्ही बघू. बेळगावीचं बेळगाव करणार का? बघू आता काय करतात ते, असं म्हणत सामंतांनी काँग्रेसला चॅलेंज दिलं आहे.
बारसूच होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावरही उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच प्रोजेक्ट पुढे जाईल. कातळ शिल्प वगळलं जाईल. ही शिल्प शेतकऱ्यांकडे राहतील, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं उदय सामंत म्हणालेत.