शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्य, उदयनराजे यांचा संताप, म्हणाले, असं वाटत की, तलवार घेऊन…

| Updated on: Dec 02, 2022 | 9:30 PM

तीन डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला. रायगडावर जनआक्रोश आंदोलन करणार आहेत.

शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्य, उदयनराजे यांचा संताप, म्हणाले, असं वाटत की, तलवार घेऊन...
Follow us on

मुंबई – आता मुंडकी छाटावी, असं वाटतं, असा संताप उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. तुमच्या आईवडिलांविषयी असं बोललं तर तुम्हाल संताप येणार नाही का, असा सवाल उद्यनराजे यांनी विचारला. शिवाजी महाराज नसते तर आपले आईवडीलपण नसते. मुंडकी कुणाची छाटली जाणार, यावर ते म्हणाले, जे कोणी असतील ते बघुना. मुंडकी छाटण्याची भाषा ही उदयनराजे यांची भावना आहे. मात्र, त्यांनी आधी राजीनामा देऊन भाजपमधून बाहेर पडावं, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या तीव्र भावनांचा स्फोट झाला. त्याकडं गांभीर्यानं पाहायला हवं. आधी त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला पाहिजे. त्या अपमानाचं समर्थन केलं जातंय. असं माझं मत असल्यांचही ते म्हणाले.

या वक्तव्यानंतर विरोधक राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांना हटविण्याची भाषा करत आहेत. उदयनराजे यांना तर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचविल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजूनही राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांना विनंती आहे की, त्यांनी हा विषय आता संपवायला लागेल. वेदना मला झाल्या आहेत. माझ्यापरीनं जे काही करायचं ते करणार असल्याचंही उदयनराजे म्हणाले.

तीन डिसेंबरपर्यंत अल्टिमेटरम दिला. रायगडावर जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. रायगडकडं जाताना इशारा दिला. पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्यात आले. पाच डिसेंबरनंतर राज्यपालांवर कारवाई होऊ शकते, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.