मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale and CM meeting) यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन तास चर्चा केली. पण उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale and CM meeting) काही अटींवर ठोस निर्णय न होऊ शकल्यामुळे काहीही निर्णय होऊ शकला नाही. उदयनराजेंनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर मंगळवारी लगेच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.
उदयनराजेंच्या अटी काय?
उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा दिल्लीत होईल हे यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. पण उदयनराजेंच्या आणखी काही अटी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार,
राष्ट्रवादीकडूनही मनधरणीचे प्रयत्न
उदयनराजेंनी पक्ष सोडू नये यासाठी राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. कारण, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. फक्त साताऱ्यातच नव्हे, तर राज्यभरात उदयनराजेंचा स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीला फायदा होईल. यासाठी राष्ट्रवादी विविध माध्यमातून उदयनराजेंची मनधरणी करत आहे.
भाजपची तिसरी मेगाभरती
भाजपने यापूर्वी दोन टप्प्यात झालेल्या पक्ष प्रवेशांमध्ये अनेक नेत्यांना पक्षात घेतलं होतं. आता तिसऱ्या टप्प्यात उर्वरित नेते भाजपात जाणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्यासह इतर काही नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.