मुंबई: उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी (Udayanraje Collar Style) प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले, “ही माझी स्टाईल (Raje Style) आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं?”
उदयनराजे भोसले म्हणाले, “ही माझी स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं? कशावरही चर्चा होते. मुद्द्यांचं राजकारण करु नका, तर समाजकारण करा. लोकं आशिर्वाद देतील.”
VIDEO: कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे भोसले#UdayanrajeBhosale #UdayanrajeStyle pic.twitter.com/Uu7Egl6uBP
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 24, 2019
शरद पवार सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याच्या चर्चेवर उदयनराजे भोसले काहीसे भाऊक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, “शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी.”
पुढची निवडणूक सोपी जावी म्हणून पुढील रणनिती कशी असेल यावर उदयनराजेनी मिश्किल उत्तर दिलं. आगामी निवडणुकीत मकरंद अनासपुरेंच्या “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा” या चित्रपटाप्रमाणे काम करणार असल्याचं ते म्हणाले.
उदयनराजेंनी राजेशाहीवरुन होत असलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “राजेशाही असती तर बलात्काराच्या इतक्या घटना होऊच दिल्या नसत्या. बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या.”
उदयनराजेंनी त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यासाठी ऐन तारूण्यात मी तुरुंगात गेलो. मात्र, अन्यायाविरोधात लढत राहिलो.