पुणे : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale Pune airport) पुणे विमानतळाहून चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना झाले. शनिवारी सकाळी 9 वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी उदयनराजेंचा भाजप प्रवेश प्रवेश होईल. त्यापूर्वी उदयनराजे (Udayanraje Bhosale Pune airport) त्यांच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द करतील.
पुण्याहून जाताना उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्यसभा खासदार अमर साबळे उपस्थित होते. अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एखाद्या नेत्याचा भाजप प्रवेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
उदयनराजेंकडून भाजप प्रवेशाची माहिती
“आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे, आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”, असे ट्विट करत उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना भाजप प्रवेशाची माहिती दिली.
उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
शरद पवारांची भेट
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला पुन्हा फोडणी दिली. उदयनराजे हे भाजपात येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
VIDEO :