मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा स्वगृही (Udayanraje Bhosale Gopinath Munde) परत येणार आहेत. उदयनराजेंनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत भाजप ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा प्रवास केला. राज्यात यापूर्वी युतीचं सरकार असताना त्यांना महसूल राज्यमंत्रिपद (Udayanraje Bhosale Gopinath Munde) देण्यात आलं होतं. हे मंत्रिपद कसं मिळालं याचा किस्सा उदयनराजेंनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर सांगितलं होतं. यावेळी ते राजकीय आठवणी सांगताना भावूकही झाले होते.
मंत्रिपद मिळाल्याचा किस्सा
आपल्याला वडिलांनंतर कुणी जवळ केलं असेल तर ते गोपीनाथ मुंडे होते, असं म्हणत उदयनराजे भावूक झाले होते. त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी मंत्रिपद कसं दिलं याबाबत त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ”औरंगाबादला पक्षाची बैठक होती… ती संपल्यानंतर नाशिकमार्गे जायचं ठरवलं… नाशिकमध्ये असताना गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. मुंडे साहेबांनी सांगितलं, ‘उद्या मुंबईला या’… मी म्हटलं, काही खास काम आहे का, तर मुंडे साहेब म्हणाले, ‘तुम्ही या, तुम्हाला यावं लागेल…’ त्यांना सांगितलं काही खास असेल तर आत्ताच येतो. मुंडे साहेब म्हणाले, ‘आत्ता नको, उद्या या, तुमचा शपथविधी आहे’,” असा किस्सा उदयनराजेंनी सांगितला होता.
“… म्हणून कॉलर उडवतो”
उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल प्रसिद्ध आहे. त्यांच्या या स्टाईलची अनेकांना उत्सुकता असते. त्याचं कारण सांगताना गोपीनाथ गडावरुन उदयनराजे म्हणाले, ”लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो, त्यालाच कॉलर उडवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे मुंडे साहेब कॉलर उडवायचे, म्हणून मी देखील कॉलर उडवतो.”
उदयनराजेंची राजकीय कारकीर्द
संबंधित बातम्या :