मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. दोन्ही गटांकडून चिन्हाच्या पर्यायाबाबात चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा पर्याय दिल्यानंतर शिंदे गटाचीही 3 चिन्हांचे पर्याय दिले आहेत.
ठाकरे गटाला मशाल, तर शिंदे गटाला गदा चिन्ह मिळणार असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाने दिलेल्या दोन चिन्हांची पर्यायं सारखी आहेत.
त्रिशूळ आणि उगवता सूर्य चिन्हांचा पर्याय सारखा आहे. यामुळे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याचं चिन्ह निवडणूक आयोग वगळण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबत 3 पर्याय देखील सुचवण्यात आले आहेत. त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे.
यानंतर रविवारी रात्री उशीरा शिंदे गटाने गदा, तलवार आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली.
मात्र, सोमवारी सकाळी ठाकरेंनंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केला.
यामुळे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याचं चिन्ह हे दोन पर्याय समान झाले आहेत. यामुळे उर्वरीत राहिलेल्या चिन्हांचा पर्याय निवडावा लागणार आहे. यामुळेच ठाकरे गटाला मशाल, तर शिंदे गटाला गदा चिन्ह मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.