सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray attack on Narayan Rane) यांनी आज कणकवली इथं जाहीर सभा घेतली. भाजप खासदार नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray attack on Narayan Rane) काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आधी शिवसेना नेते सुभाष देसाई, मग संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी राणेंवर प्रचंड टीकास्त्र सोडलं.
नारायण राणे हे खाल्या मिठाला न जागणारे, खुनशी आहेत. कोकणची जनता त्यांना धडा शिकवेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 मुद्दे
- शिवसेनाप्रमुखांनी यांना लाथ मारुन बाहेर काढलं होतं. राणेंवर प्रहार
- काँग्रेसमध्ये हे (राणे) गेले होते, तेव्हा मी सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या होत्या. आता भाजपला शुभेच्छा देतो.
- रामायणातले राक्षस मायावी रूप धारण करायचे, तसेच हे आहेत. शिवसेना,काँग्रेस मग स्वत:चा पक्ष आता भाजप. (राणेंना राक्षसाची उपमा)
- मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, तू काय सांगतोस 10 रुपयात थाळी काय मातोश्रीवर बनवून देणार म्हणून.
- करुन करुन भागले आणि देव पूजेला लागले
- वाकवली ती मान आणि म्हणे स्वाभिमान, आज स्वाभिमान या शब्दाला आनंद झाला असेल.
- दादागिरी कुणी करु नये, तोडून मोडून टाकू. इथली जनता मर्द.
- या मतदारसंघावर (कणकवली) भगवा फडकावा ही श्रींची इच्छा. इथे विजय जाहीर झाल्यावर ताबडतोब येणार
- आजची सभा केवळ शिवसेनेची न होता युतीची झाली असती, जर राणे नसते तर
- गाडलेली भुते का काढता? घरात चोर दरोडेखोर का घुसवता?
उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
- 21 तारखेला संपूर्ण कोकण भगवा करणार अश्या निश्चयाने तुम्ही आलात आणि म्हणून पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद.
- कणकवली मध्ये मी आपल्या अधिकृत उमेदवाराला जिंकवण्यासाठी इथे आलेलो आहे.
- संपूर्ण महाराष्ट्र भगवा होणार असे चित्र आपल्याला दिसत आहे.
- मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार दिला असता त्याच्याही प्रचाराला आम्ही आलो असतो.
- जे समोर उभे आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारून हाकलून लावलं होतं
- शिवसेनाप्रमुखांनी यांना हाकलले म्हणून शिवसेना मोठी झाली त्यानंतर हे काँग्रेसमध्ये गेले मग स्वतःचा पक्ष काढला आता भाजपमध्ये गेले. मी भाजपाला शुभेच्छा देतो.
- राम मंदिराबाबत कोर्टाकडून आपल्याला न्याय अपेक्षित आहे.
- सुसंस्कृत भोळाभाबडा कोकण आणि खुनशी वृत्ती असं चित्र आहे.
- मी आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार.
- १० रुपयांमध्ये गरिबांना जेवण देणार. ज्या मातोश्री वर जेवले त्या मीठाला हे जागले नाहीत ते काय करणार ? आता गरिबांच्या जेवणामध्ये मिठाचा खडा टाकू नका.
- करून करून भागले आणि देवपूजेला लागले. देवपूजा करताना ज्यांनी चपला काढल्या नाहीत असे लोक देवपूजेला लागली कशी ?
- कोकणातली जनता ही भोळी भाबडी आहे आणि कोणाचही वाईट चिंतणारी नाही अशी ही जनता आहे.
- विनायक राऊत आणि वैभव कदम यांनी यांची गुंडागर्दी मोडून काढली.
- ही पाठीमागे वार करण्यारी अवलाद आहे हे माझ्याकडे तर नको, पण माझ्या मित्राकडे सुद्धा नको हे सांगण्याचे काम मी करत आहे.
- त्यांच्यात काही दम नाही अरे बोल की का रे केलं तर पुन्हा हे उभे राहणार नाहीत.
- सत्तेचा माज आहे. आज स्वाभिमान हा शब्द खूप आनंदीत झाला असेल कारण, मला इतका दिवस काळिमा लागला होता. इकडे वाकवा मान तिकडे वाकवा आणि म्हणे स्वाभिमान.
- या भुतांना बाहेर नाही काढलं तर ही तुमच्या मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही.
- १ रुपयांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी करणार.
- घरगुती वापरावरील ३०० युनिटपर्यंत च्या वीज बिलावर कपात करण्यात येईल.
- मुलींसाठी शालेय शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन शिक्षण देखील मोफत.
- विद्यार्थ्यांसाठी बससेवा मोफत.
- आपले केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये आपल्या देखील मजबूत सरकार येत आहे. जे तुमच्या आडवे येतील त्यांना हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही.
- विकास म्हणजे समृद्धी पाहिजे कोणाचातरी विनाश करणारा विकास नको.
- माझा छान हिरवागार कोकण राख करून नाणार उभा करणार असाल तर मला असा विकास नको.
- जे आहे ते टिकवायचं आणि दुसरं वाढवायचं याला म्हणतात विकास. हे आहे त्याला भुईसपाट करणे म्हणजे विकास नाही.
- मुंबईमध्ये देखील जी शिवसेना उभी आहे ती तिथल्या कोकणी माणसामुळे आहे.
- कोकणामध्ये एक जादू आहे एक माया आहे. मायेचा ओलावा आहे.
- संपूर्ण कोकण किनारा हा मला भगवा करून पाहिजे.
- यावेळेला या मतदारसंघावर शिवरायांचा भगवा फडकवा.
- या किल्ल्याचे नाव या जिल्ह्याला दिले आहे येथे दुसरा कोणताही झेंडा फडकता कामा नये.
- हे राज्य व्हावे ही तर श्रीं ची इच्छा. हे करण्यासाठी इथले मावळे तयार आहेत.
- विजय झाल्यानंतर इथे मी पुन्हा येणार आहे.
- इथे कुणी दादागिरी करण्याच्या फंदात पडू नये. कोकणी जनता ही भोळीभाबडी आहे पण हि मर्द आहेत. गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही.