मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावरही उत्तर दिले (Uddhav Thackeray on Sharad Pawar Ram Mandir). शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टर्सचीच गरज आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर केलेल्या विधानावरही विचारणा केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी अयोध्येत राम मंदिर उभं राहतंय त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त असल्याचं म्हटलं. तसेच मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी डॉक्टर्स लागणार आहे, असं म्हटलं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :
“विरोधक विमानाने न जाता बैलगाडीतून का जात नाही?”
उद्धव ठाकरे म्हणाले, “तंत्रज्ञान उपलब्ध असून उपयोग न करणं दुर्भाग्यपूर्ण आहे. मी घराबाहेर पडत नाही, असा आरोप करणारे विमानातून न जाता बैलगाडीतून का जात नाही. जर तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही, तर मग शोध का लावतात?”
“आता तंत्रज्ञान प्रचंड विकसित आहे. कोरोनाच्या संसर्गाचाही धोका आहे. त्यामुळे मंत्रालयही बंद आहे. काम करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. मी घरात बसूनही राज्य हाकता येतं. मी घरातून निर्णय घेत आहे. प्रत्यक्ष भेटीमध्ये फक्त एकाच ठिकाणी जाता येते, आता एकाचवेळी अनेक ठिकाणी जात आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
“जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही”
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही. जनतेचा माझ्यावर आशिर्वाद माझ्यावर आहे. त्यामुळे मला कुठलीही चिंता नाही. मी जनतेच्या आरोग्याची काळजी करत काम करत आहे. मी मुख्यमंत्री झालो आणि जागतिक आणीबाणीच आली. कोरोनाबरोबर जगायला सगळ्यांनीच शिकायला हवे.”
हेही वाचा :
Uddhav Thackeray | परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray | भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता : उद्धव ठाकरे
हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला
Uddhav Thackeray on Sharad Pawar Ram Mandir