मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगलं काम होवो, ही सदिच्छा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022
आज एकनाथ शिंदे यांच्यावर जी जबाबदारी पडली. त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांना शुभेच्छा दिल्या. अपेक्षा अशी आहे की एकदा राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा होतो. तो कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी असेल. पण शपथ घेतल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो. राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी ही अपेक्षा आहे मी त्यांना बोलून दाखवली. त्यासाठी त्यांना अंतकरणापासून शुभेच्छा दिल्या, असं शरद पवार यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी @mieknathshinde जी यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेता असलेल्या शिंदेंकडे समृद्ध राजकीय, विधिमंडळविषयक आणि प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील असा विश्वास मला वाटतो.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2022
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी @Dev_Fadnavis यांचे अभिनंदन करतो. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही सरकारसाठी मोठी संपदा आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेला ते अधिक बळकटी देतील याची मला खात्री आहे.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2022
‘एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे’, असं ट्वीट करत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाले.
प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है.
एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे. https://t.co/uBp4yBsU5D
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2022