मुंबई : आज शिवसेना (Shi vsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्त्यव्याचा देखील जोरदार समाचार घेतला आहे. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या उद्गारातून झाली. मी याठीकाणी राज्यपाल हा शब्द मुद्दाम वापरत नाही. आज नड्डा म्हणाले पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची. हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची. राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान भेसूर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तेव्हा देशाला अनुशासन पाहिजे त्यासाठी शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. तेव्हा त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, पुल देशपांडे दुर्गा भागवत साहित्यिक विचारवंत यांनी लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचं ऐक्य अवलंबून नसतं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जनतेनेही एकत्र आलं पाहिजे. असे आवाहनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपाकडून दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी हिटलरचे उदाहारण दिले, दुसऱ्या महायुद्धात हिटलर जिंकेल असं वाटत होतं. त्यावेळी डेव्हिड लो व्यंगचित्र काढायचा या व्यंगचित्रांमुळे हिटलर नामोहर झाला होता. हा माणूस कोण आहे, त्याला घेऊन या असे आदेशच हिटलरने तेव्हा दिले होते. तेच आज देशात चाललंय आहे. जरा कोण बोललं तर त्याला दमदाटी केली जात आहे. बऱ्याबोलाने किंवा लोभाने आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. ही अटक आणि सर्व गोष्टी पाहिल्यावर मला गडकरींसारखं वाटत आहे. राजकारण सोडायचं नाही. पण राजकारणाची घृणा वाटत असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका राजस्थानी समाजाच्या मेळाव्यात बोलताना जर मुंबईमधील राजस्थानी आणि गुजराती माणसं चालली गेली तर मुंबई आणि परिसरात पैसा उरणार नसल्याचे वक्तव्य केलं होतं, तसेच आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहे, ती देखील पुसरली जाईल असे राज्यपालांनी म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.