VIDEO: सात टर्मचा खासदार, मुंबईत आत्महत्या, भाजपच्या नेत्यांकडून छळ, त्याचीही चौकशी, ठाकरेंकडून मोठी घोषणा

| Updated on: Feb 28, 2021 | 10:00 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी बोलताना भाजपचीही कोंडी केलीय.

VIDEO: सात टर्मचा खासदार, मुंबईत आत्महत्या, भाजपच्या नेत्यांकडून छळ, त्याचीही चौकशी, ठाकरेंकडून मोठी घोषणा
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी बोलताना भाजपचीही कोंडी केलीय. “मागील आठवड्यात जशी पूजा चव्हाणची दुर्दैवी आत्महत्या झालीय तशीच मुंबईत आणखी एक आत्महत्या झालीय. 7 वेळा खासदार असलेल्या मोहन डेलकरांनी आत्महत्या केलीय. त्यांच्या 13-14 पानी सुसाईड नोटमध्ये भाजपच्या नेत्यांची नावं आहेत. त्या नेत्यांनी त्यांचा छळ केलाय,” असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला. तसेच मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासाअंती ही नावं समोर येतील, असाही सूचक इशारा दिलाय (Uddhav Thackeray declared investigation of MP Mohan Delkar suicide and name of BJP leader in it).

उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात मुंबईत आणखी एक आत्महत्या झालीय. तिच्याबद्दल कुणीच काही का बोलत नाही. संजय राठोड यांच्यावर संशय व्यक्त करता म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. मात्र, पूजा चव्हाणच्या दुर्दैवी आत्महत्येत सुसाईड नोट नाही, कुणावर आरोप नाही तरी गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय. मात्र, मुंबईत जी दुसरी आत्महत्या झाली त्या प्रकरणात 13-14 पानांची सुसाईट नोट आहे. त्यात विशिष्ट नावं लिहिली गेलीय. आता ती नावं जर उच्च पदस्थ असतील तर त्यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे. तसेच मुंबई पोलीस याचा तपास करत आहेत त्यांना सहकार्य करायला लावलं पाहिजे. अन्यथा ते जर भाजपचे असतील तर त्यांना असा कुणाचा छळ करुन आत्महत्येला प्रवृत्त करायला त्यांच्या वरिष्ठांचा आशिर्वाद आहे का?”

“शरद पवारांवर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे की ते मला न्याय देतील”

“एका खासदाराने आत्महत्या केलीय. ते 7 टर्मचे खासदार होते. तो खासदार एका मतदारसंघातून 7 वेळा जिंकून येतो आणि त्यानंतर त्यांना मुंबईत येऊन आत्महत्या करावी लागतेय. त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की शरद पवारांवर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे की ते मला न्याय देतील. त्यांनी जी नावं घेतलीय ती जर भाजपच्या उच्चपदस्थांची असतील तर त्यांना तसा छळ करण्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा परवाना भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांनी दिलाय का? त्यांचा यांना आशीर्वाद आहे का? याचं उत्तर मिळालं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

“खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर कुणी रस्त्यावर का उतरलं नाही?”

उद्धव ठाकरे म्हणाले, “जशी पूजाने आत्महत्या केली तशी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. यात महिला आणि पुरुष हा एक फरक आहे. पण डेलकर यांनी आत्महत्या केल्याने त्यांचंही घर उघडं पडलंय. त्यांच्या पत्नी निराधार झाल्यात. त्याही महिलाच आहेत. त्यांची बाजू कोण का मांडत नाही. त्यांच्यासाठी कोणी रस्त्यावर का उतरत नाही.

“डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये कुणाची नावं आहेत ती तपासाच्या मार्गाने”

“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस त्यांचा तपास करेलच. मात्र, तो केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो की त्यांनी तेथील प्रशासनाला मुंबई पोलिसांना सहकार्य करण्यास सांगावं. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये कुणाची नावं आहेत ती तपासाच्या मार्गाने येऊ द्यात. भाजपने काहीतरी वेडेपणा केला म्हणून मी तसं करणार नाही. या प्रकरणात आम्ही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

या प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, “मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत ईडीआर दाखल झालाय आणि तपास सुरु आहे. हा तपास जसा पुढे जाईल तसा त्या प्रकरणी आवश्यक निर्णय घेतला जाईल. त्यावरच गुन्हा कसा दाखल करायचा हे ठरवलं जाईल.”

संबंधित बातम्या :

VIDEO: दादा प्रेसमध्ये थोडेच बोलले, बोलले ते थेटच, हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून दाखवा

संजय राठोडांवर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, 10 मोठे मुद्दे

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर; सीएम म्हणतात, तो काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही!

संबंधित व्हिडीओ :

Uddhav Thackeray declared investigation of MP Mohan Delkar suicide and name of BJP leader in it