मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांचं बंड, राज्यात झालेलं सत्तांतर यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत (Udhhav Thackeray Interview) झाली. सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झालाय. यात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. मुलाखतीच्या शेवटी शिंदेगटाच्या एका मागणीसंदर्भात संजय राऊतांनी प्रश्न विचारला. “आम्हाला बंडखोर म्हणू नका. आम्ही बंडखोरी केलेली नाही, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी लढतोय”, अशी मागणी शिंदेगटाचे आमदार वारंवार करत आहे. त्यांची ही मागणी ठाकरेंनी मान्य केली आहे. “आता मी त्यांना बंडखोर म्हणत नाही. तर विश्वासघातकी म्हणतोय, संपूर्ण मुलाखतीत विश्वासघातकी असाच उल्लेख केलाय. मी त्यांचाही मान ठेवलाय”, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
“आम्हाला बंडखोर म्हणू नका. आम्ही बंडखोरी केलेली नाही, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी लढतोय”, अशी मागणी शिंदेगटाचे आमदार वारंवार करत आहे. त्यांची ही मागणी ठाकरेंनी मान्य केली आहे. “आता मी त्यांना बंडखोर म्हणत नाही. तर विश्वासघातकी म्हणतोय, संपूर्ण मुलाखतीत विश्वासघातकी असाच उल्लेख केलाय. मी त्यांचाही मान ठेवलाय”, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार शिवसेना आमचीच असा वारंवार दावा करत आहेत. त्यामुळे ठाकरेंवरच शिवसेना आमची असल्याचे पुरावे द्यावे लागत आहेत. हाच प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. तेव्हा शिवसेना कायम ठाकरेंचीच आहे. त्यासाठी आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. जनताच आमचे पुरावे देईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. याच मुद्द्यावरुन मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे, असं सांगत आपला इरादा स्पष्ट केला.
त्यावर राऊतांनी प्रश्न केला, तुमचे मुख्यमंत्री होणं चुकलं? त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं, यात दोन गोष्टी आहेत, समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केलं असतं. तर यांनी दुसरंच काहीतरी केलं असतं. कारण यांची भूकच भागत नाहीये. यांना मुख्यमंत्री पदही हवं आहे आणि यांना शिवसेना पक्षप्रमुख ही व्हायचं आहे. हे शिवसेना पक्षप्रमुखांसोबत यांची तुलना करत आहेत, ही राक्षसी महत्वकांक्षा आहे, त्याला हाव म्हणतात. एक दिलं की तुझं तेही माझं, माझं तेही माझं, याचं तेही माझं, इथपर्यंत यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणांना सीमा नसते, असा घणाघात ठाकरेंनी केला.