मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मोठी माहिती समोर आणली आहे. शिवसेनेचे नेते आढळराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऱाष्ट्रवादीची साथ सोडा, असं सांगितलं होतं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तेव्हा आम्ही सांगितलं. आता आपण स्वबळावर लढायचं. राष्ट्रवादीची साथ सोडा. शरद पवारांनी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर युती केली त्या पक्षाला संपवलं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर नको. आपण स्वबळावर उभं राहू. आम्ही पडलो तरी बेहत्तर. पण आपण उभं राहू. केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्या मागे काही नाही. आपल्यामागे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत. चला मैदानात. उभं राहू. नव्याने लढू. पाच दहा वर्ष लागतील. पण उभं राहू. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हे सर्व मानणार नाहीत. शक्य होणार नाही. आपल्याला राष्ट्रवादी सोडून चालणार नाही.’ अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिलीय.
हकालपट्टीवर बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंशी बोलणं झाल्यावर सकाळी 6 वाजल्यापासून मला फोन येऊ लागले. तुमची हकालपट्टी झाली आहे. मलाच कळेना का हकालपट्टी झाली. मी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकली अभिनंदनाची. मी साहेबांना हकालपट्टीच्या बातमीची पोस्ट टाकली. सकाळी साडेनऊ वाजता फोन आला. तीन फोन आले. चुकीने झालं. विनायक राऊत आणि अनिल परब यांचा फोन आला. चुकीने झालं सांगितलं. मी काय एवढा छोटा माणूस आहे का चुकीने व्हायला. त्यानंतर म्हटलं ठिक आहे. चुकीने तर चुकीने मग मी शिवसेना भवनात गेलो. सर्व चर्चा झाली. काय करायचं कसं करायचं ठरलं.’
‘कोरोना काळात मदत व्हायची ती फक्त एकनाथ शिंदेंकडून. चाकणला 68 कोटी, मंचरला 5 कोटी, त्या दिवशी 3 कोटी. जुन्नरला 15-16 कोटी हा सर्व निधी शिंदेंनी दिला. त्यांना आमच्या व्यथा माहीत होत्या. निवडून येताना काय त्रास होतो हे त्यांना माहीत होतं. त्यांनी समजून घेतलं. जेव्हा उठाव झाला आणि महाराष्ट्र पेटला. राजकारण ढवळून निघालं. जवळपास 40 आमदार गेले. जेव्हा 40 आमदार जातात आपण कुठे तरी चुकतोय. धोरणात काही बदल व्हायला हवा होता. नेतृत्वाला मान्य होतं. आम्ही गप्प बसलो,’ असंही आढळराव पाटील म्हणालेत.
आढळराव पाटील यांनी शुभेच्छा पोस्टवर देखील भाष्य केलंय. ‘राज्यात नवीन मुख्यमंत्र्याची नेमणूक झाली. कर्तव्य म्हणून अभिनंदन केलं. पक्षाला आवडलं नाही. तीन दिवसात माझी हकालपट्टी केली. गेल्या 15 वर्षापासून काही नसताना मी या जिल्ह्यात काम केलं. तुम्ही एका पोस्टमुळे माझी हकालपट्टी करताय… मला बोलायचं तरी. विचारायचं तरी. मी साहेबांना फोन केला. तालुक्यातील लोक माझ्याकडे येणार होते. मी येणार होतो. पण वेळ नाही. ते म्हणाले, तुम्ही पोस्ट टाकली मला वाईट वाटलं. मी म्हणालो, साहेबजी, मला त्यात चुकीचं काही वाटलं नाही. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं मला चुकीचं वाटत नाही. ते म्हणाले, तुम्ही 15 वर्ष जाणार जाणार म्हणून गेला नाहीत. पण 20 वर्ष कुणी जाणार नाही, याची खात्री असलेले लोक गेले. पण ठिक आहे.’