मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा (Uddhav Thackeray Sworn in Ceremony) सुरु झाला. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित होते. (Uddhav Thackeray Sworn in Ceremony)
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेतली.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीने या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. मग राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी तर नंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या शपथविधीने सांगता झाली.
या शपथविधीसाठी देशभरातून मान्यवर आले होते. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते उद्धव ठाकरे यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. राज ठाकरे हे सहकुटुंब आले होते.
पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा
शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो.
त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! @OfficeofUT @uddhavthackeray— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019
मंत्रिमंडळाची बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर 8 वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शपथविधी लाईव्ह Uddhav Thackeray Sworn in Ceremony
पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन, ट्विट करुन शुभेच्छा
Congratulations to Uddhav Thackeray Ji on taking oath as the CM of Maharashtra. I am confident he will work diligently for the bright future of Maharashtra. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2019
LIVE नितीन राऊत यांना मंत्रिपदाची शपथ https://t.co/RzcbC93LOz @NitinRaut_INC pic.twitter.com/ckoLCd9EWu
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
बाळासाहेब थोरात यांना मंत्रिपदाची शपथ https://t.co/RzcbC93LOz @bb_thorat pic.twitter.com/DNOirSr6Yj
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
LIVE : छगन भुजबळ यांनी घेतली शपथ https://t.co/RzcbC93LOz @ChhaganCBhujbal pic.twitter.com/wQVkGCI0Q8
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
LIVE जयंत पाटील यांनी शपथ घेतली https://t.co/RzcbC93LOz @Jayant_R_Patil pic.twitter.com/lkOGSNjsQx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
LIVE – सुभाष देसाई यांना शपथhttps://t.co/RzcbC93LOz @Subhash_Desai pic.twitter.com/M3EpEPLKCv
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
LIVE- एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलीhttps://t.co/RzcbC93LOz pic.twitter.com/eys3uLqxeD
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
LIVETV | मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे उपस्थितांसमोर नतमस्तकhttps://t.co/eIKj4Eop7R #ठाकरेसरकार pic.twitter.com/JxPOryaG4w
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली https://t.co/RzcbC93LOz pic.twitter.com/F4wk3nd1wy
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
#सांगली – शपथविधीच्या सोहळ्यासाठी शहरातील कॉलेज कॉर्नर चौकात भल्या मोठ्या LED, प्रेक्षकांची पसंती टीव्ही 9 मराठी pic.twitter.com/ZtlmhVCoUG
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 28, 2019
Sonia Gandhi in a letter to Uddhav Thackeray: Shiv Sena,NCP&Congress have come together under quite extraordinary circumstances, at a time when country faces unprecedented threats from BJP. I regret that I’ll not be able to be present at the ceremony (oath-taking). #Maharashtra pic.twitter.com/wHs95Y7mV6
— ANI (@ANI) November 28, 2019
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यभरातील कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. तीनही पक्षांचे झेंडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. शपथविधीपूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीने ज्या कार्यक्रमावर सरकार चालणार आहे, तो किमान समान कार्यक्रम (Common Minimum Program) जाहीर केला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत,किमान समान कार्यक्रम (Common Minimum Program) सांगितला. शेतकरी, कामगार, युवक, महिला, शहर, पर्यटन, रोजगार, अशा विविध विषयांना किमान समान कार्यक्रमात स्पर्श केला आहे.