वर्धा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी देवेंद्र फडणवीस यांना लाथ मारली, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली (abu azmi criticises uddhav Thackeray) आहे. वर्ध्यात समाजवादी पक्षाची जनजागृती यात्रा पोहोचली. यावेळी अबू आझमी यांनी केंद्र सरकारच्या एनआरसी, CAA कायद्यावरही टीका केली.
“मी महाराष्ट्रातील सर्व जाती, अनुसचित जाती, जमातींना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बरोबर योग्य वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लाथ मारली आणि एक नवी महाविकासाआघाडी स्थापन केली. अन्यथा महाराष्ट्रात उत्तरप्रदेशासारखी स्थिती असती,” असेही अबू आझमी म्हणाले.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू, मुस्लीम, शीख हे सर्व एकत्र असतील असे शिकवले आहे. उत्तरप्रदेशात पोलिसांचे काही लोक गुंडागर्दी, मारहाण, दगडफेक करतात. शांतेतत आंदोलन सुरु असेल तेथे जाऊन लाठीचार्ज करतात. गाड्यांवर पेट्रोल टाकून त्या जाळतात,” असेही ते यावेळी (abu azmi criticises uddhav Thackeray) म्हणाले.
NRC आणि CAA च्या विरोधात समाजवादी पार्टीच्यावतीने अबू आझमी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात 1 लाख किलोमीटर यात्रा करून असहकार आंदोलन करण्यात येत आहे. वर्ध्यातील आंदोलन अबू आजमी त्यांनी फडणवीसांवर टीका केली. तर उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहे. पत्रकार परिषदेत टीका करून नागरिकत्व कायद्याचा विरोध केला आहे.